- रोटरी क्लब ऑफ करवीर कोल्हापूरचे सचिव स्वप्निल कामत यांची माहिती.
कोल्हापूर : (जनप्रतिसाद न्यूज विशेष प्रतिनिधी, नंदकुमार तेली.)
जागतिक हृदय दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ करवीर कोल्हापूरतर्फे शनिवार दि. 1 ऑक्टोबर 2022 रोजी शाहू स्मारक भवन येथे सकाळी दहा वाजता "संवाद हृदयाशी" हा परिसंवाद आणि कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती रोटरी क्लब ऑफ करवीर कोल्हापूरचे सचिव स्वप्निल कामत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी बोलताना कामत म्हणाले, जिल्हा विशेष शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांच्या हस्ते व्याख्यान आणि कार्यशाळेचे उद्घाटन होणार आहे. यावेळी मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
कोल्हापुरातील प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ व डॉक्टर शिंदे सुपर स्पेशालिटी हार्ट क्लिनिकचे डॉक्टर अलोक शिंदे यांचे हृदयरोगाबद्दल समज व गैरसमज याविषयी जनजागृती पर व्याख्यान होणार आहे. तसेच कोल्हापुरातील प्रसिद्ध आहार तज्ञ रुफिना कुटीन्हाहो या आरोग्यदायी हृदयासाठी आहार याबद्दल मोलाचे मार्गदर्शन करणार आहेत. तसेच या कार्यशाळेमध्ये सीबीसी, बीएसीएल आर आदींसह विविध रक्ताच्या चाचण्या अत्यल्प दरामध्ये करण्यात येणार आहे.
त्याचबरोबर ईसीजी, इको या रक्ताच्या चाचण्या आणि डॉक्टरांचे मार्गदर्शनही मिळणार आहे.
या पत्रकार परिषदेला क्लबचे अध्यक्ष उदय पाटील, निलेश भागुले, प्रवीण शिंदे आदी उपस्थित होते.