केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मातंग आघाडी महाराष्ट्र राज्याचे शिस्टमंडळ भेटले व रामदास आठवले साहेब यांना निवेदनाद्वारे काही मागण्या करण्यात आल्या .
यामध्ये प्रामुख्याने कैलासवासी हनुमंतराव साठे यांच्या मुलाला विरेन हनुमान साठे यांना लोकशाहीर आण्णाभाऊ साठे विकास महामंडळ किंवा महात्मा फुले विकास महामंडळ याच्या चेअरमन पदी नियुक्ती करण्यात यावे व मातंग आघाडीच्या महाराष्ट्र राज्याच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात यावे तसेच मुख्य प्रवाहामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या महाराष्ट्र राज्याच्या कमिटीमध्ये महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष पदाचे ही मागणी करण्यात आली, विरेन हनुमान साठे यांचा एकंदरीत राजकीय व सामाजिक प्रवास पाहता विरेन हनुमान साठे यांना महाराष्ट्र राज्य जिल्हा समिती होमगार्ड समितीचे सदस्य असल्या वेळी अनेक त्यांनी काम केले आहेत यामध्ये प्रामुख्याने 52 हजार मुलांना नोकरी महाराष्ट्र मध्ये पहिले यांच्या कारकीर्दीमध्ये देण्यात आले आहे तसेच महाराष्ट्र मध्ये भीमा कोरेगाव या ठिकाणी बंदोबस्ती धुरा त्यांनी यशस्वीरित्या अनेक वर्षापासून पार पाडले आहे याचा विचार करता विरेन साठे हे सामाजिक व राजकीय निर्णय योग्य ते घेऊ शकतात असे दिसून येत आहे,विरेन हनुमंत साठे यांना जबाबदारी दिल्याने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया याचा संपूर्ण महाराष्ट्र मध्ये प्रचार व प्रसार पुण्यामध्ये खूप मोठी मदत होऊ शकते तसेच बौद्ध समाज व मातंग समाज एकीकरणाकरता ही खूप मोठी मदत होऊ शकते विरेन साठे यांना चळवळीचे अध्यात ज्ञान असल्यामुळे ते यशस्वीरित्या आरपीआयची चळवळ चालू शकतात असे शिष्टमंडळाने आठवले साहेबांच्या सोबत चर्चा केली आहे.
रामदास आठवले साहेबांसोबत चर्चा केल्या असता आठवले साहेबांकडून आश्वासन देण्यात आलेले आहे की यावरील योग्य ते निर्णय घेण्यात येईल व विरेन साठे यांना महामंडळाच्या चेअरमन पदी, पक्षाच्या महाराष्ट्र राज्याच्या मुख्य प्रवाहामध्ये योग्य ते स्थान दिले जाईल तसेच मातंग आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्याकरता विचार करून लवकरच निर्णय देऊ असे आश्वासन देण्यात आले आहे,या प्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मातंग आघाडीचे कोकण प्रदेशाध्यक्ष तुषार कांबळे, मुंबई प्रदेशाध्यक्ष नंदकुमार साठे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष मनोज निवगिरे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुरज तुपे, पश्चिम महाराष्ट्र संघटक चंद्रकांत भास्कर, दक्षिण मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष प्रमोद ठोंबरे, पुणे जिल्हा अध्यक्ष रवी पवार, पश्चिम महाराष्ट्र सचिव योगेश जाधव, पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष अश्विन कुठे, पुणे शहर उपाध्यक्ष लखन कांबळे, पुणे संघटक राजु येल्लोरे, पुणे सहसचिव योगेश थोरात, वडगाव शेरी मतदार संघ अध्यक्ष शंकर चव्हाण, वडगाव शेरी मतदार संघ उपाध्यक्ष पंजाब मुळे आधी उपस्थित होते.