"शेंडूर बीट" ता.कागल येथे एकात्मिक बालविकास च्या योजनेअंतर्गत पोषण माह विकास कार्यक्रम संपन्न.
- अंगणवाडी सेविका शेंडूर बीट ता.कागल विभागाचा उपक्रम
जनप्रतिसाद न्यूजः (कागल प्रतिनिधी)
"शेंडूर बीट" ता.कागल येथे एकात्मिक बालविकास च्या योजनेअंतर्गत पोषण माह विकास कार्यक्रम संपन्न.
- अंगणवाडी सेविका शेंडूर बीट ता.कागल विभागाचा उपक्रम
जनप्रतिसाद न्यूजः (कागल प्रतिनिधी)
- शेंडूर विभागातील ०६ गावातील १९ अंगणवाडी शाळा व सेविकांचा उत्स्फूर्त सहभाग.
- पालक वर्गाला मिळाला पौष्टिक आहाराविषयी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाचा लाभ.
एकात्मिक बाल विकास सेवा योजना, कागल व अंगणवाडी सेविका शेंडूर (बीट) विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय पोषण चळवळ अंतर्गत लोकसहभागातून पोषण माह उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमात शेंडूर विभागातील ०६ गावातील १९ अंगणवाडी शाळा व सेविकांनी उस्फूर्त सहभाग नोंदविला.
यावेळी मा.जिल्हा परिषद सदस्य सुयशा घाटगे मा. जिल्हा कार्यक्रम अधिकारी शिल्पा पाटील मॅडम, मा.प्रशासक व गट विकास अधिकारी सुशील संसारे, मा.अतिरिक्त गटविकास अधिकारी माळी साहेब, पं. स. माजी सभापती मा. पूनम मगदूम मा.प्र. बाल विकास प्रकल्प अधिकारी लांडगे मॅडम, पर्यवेक्षिका विद्या शेट्टी मॅडम आदींची प्रमुख उपस्थिती होती.
*- शेंडूर (बीट) विभागात ०६ गावातील १९ अंगणवाडी शाळा*.
शेंडूर विभागात व्हन्नाळी, शेंडूर, शंकरवाडी, केंबळी, बेलवळे बुद्रुक, बेलवळे खुर्द आदी ०६ गावातील १९ अंगणवाडी शाळांचा समावेश आहे. दरवर्षी शेंडूर बीटतर्फे ०१ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर असा "पोषण माह" उपक्रम राबविण्यात येतो. हा उपक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी प्रशासनासह प्रकल्प अधिकारी १९ शाळांच्या अंगणवाडी सेविका परिश्रम घेतात. याबद्दल उत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या अंगणवाडी सेविकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
- *विविध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण*.
या पोषण माह अंतर्गत विविध स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये पोषण गीत, पोषण प्रतिज्ञा, रांगोळीच्या माध्यमातून २१ जनजागृती संदेश, स्वस्थ बालक- पालक स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, पाककृती स्पर्धा, उखाणे स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा, संगीतखुर्ची स्पर्धा, पोषण झिम्मा स्पर्धा आदी स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
- *१९ अंगणवाडी सेविका व पालकवर्गाला मार्गदर्शनाचा लाभ.*
पोषण आहार, शासकीय योजना यासह पालकांचे पहिले १००० दिवस, ऍनिमिया, अतिसार, हात धुणे आणि स्वच्छता तसेच आरोग्य, पौष्टिक आहार याविषयी तज्ञांनी उपस्थित अंगणवाडी सेविका व पालक वर्गाला मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनाचा लाभ १९ अंगणवाडीच्या पालक वर्गाने घेतला. प्रास्ताविक बीट पर्यवेक्षिका विद्या शेट्टी यांनी केले. यावेळी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सीएचओ, आरोग्य अधिकारी, कर्मचारी, प्राथमिक व माध्यमिक मुख्याध्यापक, शिक्षक, अंगणवाडी सेविका, पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.