*जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क*
( *अनिल जोशी)*
महाराष्ट्र राज्यात सत्तेत असणाऱ्या परंतु गुजरातची चाकरी करणाऱ्या शिंदे - फडणवीस सरकारच्या नाकर्तेपणामुळे महाराष्ट्र राज्यातील वेदांता - फोक्सकॉन हा मोठा औद्योगिक प्रकल्प गुजरात येथे हलवण्यात आला असून, याच्या निषेधार्थ आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंतराव पाटील साहेब यांच्या सूचनेनुसार व शहर-जिल्हाध्यक्ष संजयजी बजाज साहेब व युवक राष्ट्रवादी शहर-जिल्हाध्यक्ष राहुलदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली,राष्ट्रवादी युवक काँग्रेस सांगली शहर जिल्हा व ग्रामीण च्या वतीने उरूण इस्लामपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा,तहसील कार्यालय समोर जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले.
यावेळी ग्रामीण जिल्हाध्यक्ष विराज नाईक,राष्ट्रवादी युवक काँग्रेस सांगली शहर जिल्ह्याचे पदाधिकारी संदीपभाऊ व्हनमाने,,विनायक हेगडे,पिंटू माने,सागर माने,अरूण चव्हाण,अफजल मुजावर,गॅब्रियल तिवडे,अक्षय अलकुंटे,सचिव डाॅ.शुभम जाधव,महालिंग हेगडे, अक्षय शेंडगे ,राहूल हिरोदगी,नितिन माने,आदीत्य नाईक,सुशांत काळे,धर्मेंद्र कोळी,राजू जाधव,विनोद नाईक,अमीन शेख,ईकबाल मुल्ला,बापू कोळेकर,चंद्रकांत नाईक,राहुल यमगर,अक्षय शेळके पाटील,आदर्श कांबळे,सुमित कुंभोजकर,आदी उपस्थित होते.