जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
( अनिल जोशी )
भारतीय वाहन बाजारपेठेत सद्य परिस्थिती पाहून, इलेक्ट्रिक वाहनांची मागणी दिवसेंदिवस वाढतच आहे. टाटा मोटर्स कंपनीचा इलेक्ट्रिक कार्स च्या बाबतीत भारतीय बाजारपेठेत मोठा दबदबा आहे. सदरहू टाटा मोटर्स कंपनी आता या सेगमेंटमध्ये, मोठा धमाका करण्यासाठी सज्ज झाली असून, भारतीय बाजारपेठेतील स्वस्त इलेक्ट्रिक कारची मागणी ओळखून, या कारची निर्मिती करण्यात आलेली आहे. टाटा मोटर्स कंपनीने ,१० लाखाच्या रेंजमध्ये, सदरहू इलेक्ट्रिक कार लॉन्च करू शकते. जागतिक इलेक्ट्रिक वाहन दिनानिमित्त, टाटा मोटर्स कंपनीने त्यांच्या नवीन इलेक्ट्रिक कारची घोषणा केली आहे. टाटा मोटर्स कंपनीची ही, पहिलीच इलेक्ट्रिक कार असून ,सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार म्हणून ओळख करण्यासाठी सज्ज झालेली असून ,त्या कारचे नाव *टाटा टियागो ईव्ही* असं देण्यात आलेला आहे. ही भारतीय बाजारपेठेतील एक किफायदशी व आकर्षक कार आहे. सर्वसाधारणपणे टाटा मोटर्स कंपनीची ही इलेक्ट्रिक कार ,28 सप्टेंबर रोजी बाजारात दाखल होईल. सध्याच्या परिस्थितीत, टाटा टियागो इलेक्ट्रिक कारला बाजारात कॉम्पिटिशन ला अशी दुसरी कोणतीही कार नसून, झिरो एमिशन कार आहे. टाटा मोटर्स कंपनीची ही इलेक्ट्रिक कार एकदा चार्जिंग केल्यानंतर सुमारे ४०० किलोमीटर पर्यंत चा प्रवास करू शकते असा दावा मीडिया रिपोर्ट्स मध्ये करण्यात आलेला आहे. सदरहू टाटा मोटर्सच्या इलेक्ट्रिक कार ची किंमत बाजारात १२,४९००० रुपये इतकी असून, सध्याच्या काळात ही बाजारातली सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार होय.