सांगली जिल्हा परिषदेत" जलजीवन मिशन "अंतर्गत चाललेल्या कामांच्या गुणवत्तेची व दर्जेची पत राखण्यासाठी ११२ अभियंत्याची नियुक्ती

0


जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

(अनिल जोशी)


 सांगली जिल्ह्यातील जिल्हा परिषदेमार्फत जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यात व तालुक्यात चालू असलेल्या कामांच्या गुणवत्तेची व दर्जेची पत राखण्यासाठी, जिल्हा परिषद प्रशासनाकडून, ११२ अभियंते नियुक्ती करण्यात आलेले आहेत. त्यांच्यामार्फत सर्व चालू असलेल्या कामांची तपासणी व देखरेख करण्यासाठी तसेच गुणवत्ता व दर्जा उत्तम राखण्यासाठी, सदरहू११२ अभियंत्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे . संबंधित अनुषंगिक कामासाठी, जिल्हा परिषद मधील सर्व विभाग प्रमुखांना तालुक्यांचे वाटप करण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली . सध्या जिल्हा परिषदेच्या जलजीवन मिशन अंतर्गत ५००च्या वर पाणीपुरवठ्याची कामे चालू आहेत .आणखी काही कामे चालू होण्याच्या मार्गावर आहेत. एकूण जवळपास अंदाजे ७००च्या वर कामे पुढील काही दिवसात चालू असतील. सदरहू सर्व जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील राहणाऱ्या सर्व कामांच्यावर देखरेख व तपासणीसाठी तसेच कामांचा दर्जा व गुणवत्तेची पत राखण्यासाठी शासकीय व कंत्राटी असे ८२ व बह्यास्त्रोत संस्थेचे ३० अशा जवळपास ११२ शाखा अभियंत्याची नेमणूक करण्यात आलेली असून त्याप्रमाणे कामांचे वाटपही झाले आहे. उप अभियंत्यांच्या नियंत्रणाखाली, सदरहू सर्व शाखा अभियंते काम करणार आहेत. जिल्हा परिषदेतील जल जीवन मिशन अंतर्गत सर्व कामांच्यावर देखरेख ठेवून, त्यांच्या गुणवत्तेचे व दर्जाचे अहवाल वेळोवेळी सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सदरहू सर्व कामांचे दर्जा व गुणवत्ता उत्तम राहून, शासकीय निकषांच्या आधीन राहून पूर्ण होण्यासाठी, एका वेब पोर्टलची निर्मिती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सदरहू जलजीवन मिशन अंतर्गत होणाऱ्या सर्व कामांची देयके अदा करण्याचे काम स्वतः मुख्य कार्यकारी अधिकारी वेब पोर्टल वरील व्हिडिओचे चित्रण पाहून करणार आहेत .या सर्व कामांच्या दर्जाच्या व गुणवत्तेच्या बाबतीत जर पुढे एखादी तक्रार प्राप्त झाली तर वालचंद कॉलेज ऑफ इंजीनियरिंग किंवा आर आय टी अशा संस्थेच्या कडन तपासणी करून त्यांच्या अहवालाच्या आधारे योग्य ती कार्यवाही करण्यात येणार आहे.

Tags

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top