*सांगलीतील सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेस, साई भगवान सेवाभावी संस्था यांचे कडून, अमरधाम स्मशानभूमीत मूलभूत सोयी -सुविधा पुरवण्याबाबत निवेदन---*
*जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क*
*(अनिल जोशी)*
सांगलीत, आज दि.२३/०९/२०२२ रोजी मा. आयुक्त सुनील पवार सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका यांना, स्मशानभूमीत नागरिकांच्या गैरसोयीबद्दल , मूलभूत सोयी - सुविधा पुरवण्याबाबत, साई सेवाभावी संस्था ,अभय नगर यांचे कडूननिवेदनदेण्यातआले .जीवनाच्या शेवटच्या विसाव्याच्या ठिकाणी म्हणजे अमरधाम स्मशान भूमीतील मूलभूत गरजा, सोयी व सुविधांकडे महापालिकेच्या प्रशासनाकडून होत असलेल्या दुर्लक्ष बाबत ,साई भगवान सेवाभावी संस्थेने दखल घेऊन, सध्या परिस्थितीतील स्मशानभूमीच्या परिस्थितीचा अभ्यास करून, सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे आयुक्त सुनील पवार यांना एक निवेदन देऊन चर्चा केली आहे. सदरहू निवेदनामध्ये अमरधाम स्मशानभूमी येथे येणाऱ्या मृतांच्या नातेवाईक आप्तेष्टान पैकी महिलांच्या सोयीकरता स्वच्छता गृह उभारण्याची मागणी करण्यात आलेली आहे . प्रत्येक समाजाच्या रितीरिवाजांप्रमाणे कार्यविधी झाल्यानंतर, शिल्लक राहणाऱ्या टाकाऊ वस्तु व अन्नपदार्थ हे उघड्यावरच टाकले जात असून, त्यासाठी ते एकत्रित संकलित करण्यासाठी एक मोठा कंटेनर, सदरहू स्मशानभूमीत ठेवण्यात यावा व त्याची रोजच्या रोज योग्य ती विल्हेवाट लावण्यात यावी अशा प्रमुख मागण्यांसह व इतर बऱ्याच मागण्यांचा निवेदनामध्ये अंतर्भाव केला असून, यावर त्वरित लक्ष देऊन कार्यवाही करण्याची मागणी साई भगवान सेवाभावी संस्था, अभय नगर याचे अध्यक्ष धनाजी कोळपे व संस्थेच्या इतर पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आलेली आहे. यावेळी साई भगवान सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष धनाजी कोळपे यांचे सह संस्थेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.