*सांगली जिल्ह्यात" द पावर ऑफ मीडिया फाउंडेशनच्या" पत्रकार संघाच्या सांगली जिल्ह्यातील प्रधान कोअर कमिटी कार्यकारणी निवडी जाहीर---*
*जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क*
*(अनिल जोशी)*
सन १९८५ पासून "पत्रकार क्षेत्रात ''कार्यरत असणारे मा.किशोरजी आबिटकर यांनी, पत्रकारांच्या "समस्या' जवळून पाहून त्यांच्या "न्याय हक्कासाठी'' ,सन २०१७ मध्ये शासकीय नोंदणीकृत "द पाॅवर आॅफ मिडिया फौंडेशन, पत्रकार संघाची '' स्थापना मा.किशोरजी आबिटकर यांच्या संस्थापक , अध्यक्षीय कुशल नेतृत्वाखाली, तसेच कार्यकुशल सचिव मा.अनिलजी कदम,व जेष्ठ पत्रकार मा.ईश्वरजी हुलवान यांच्या जबाबदारी पूर्ण साथीने करण्यात आली.आज "द पाॅवर आॅफ मिडिया फौंडेशनच्या पत्रकार संघाचे ''जाळे संपूर्ण महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर पसरले असून त्याचाच एक भाग म्हणून ,"गारगोटी''येथे झालेल्या सांगली जिल्हा कार्यकारणी बैठकीत, "क्रांतीकारकाच्या ''सांगली जिल्ह्यांसाठी"द पाॅवर आॅफ मिडिया फौंडेशनच्या पत्रकार संघाच्या "प्रधान कोअर कमिटी'' च्या निवडी " "द पाॅवर आॅफ मिडिया फौंडेशनच्या सदनिकेत,संस्थापक अध्यक्ष आदरणीय मा.किशोरजी आबिटकर, यांच्या सन्माननीय उपस्थितीत जाहीर करण्यात येऊन "निवडपत्रे'' देण्यात आली.
निवड
झालेली "द पाॅवर आॅफ मिडिया फौंडेशन, पत्रकार संघ सांगली जिल्हा "प्रधान कोअर कमिटी''
१) प्रधान कोअर कमिटी अध्यक्ष पदी मा.ईश्वरजी हुलवान,
२) प्रधान कोअर कमिटी उपाध्यक्ष पदी मा.महेशजी वैद्य,
३) प्रधान कोअर कमिटी सचिव पदी प्रा.गौतम प्रज्ञासूर्य सर,
४) प्रधान कोअर कमिटी संघटक पदी मा.आयुबखान जमादार,
५) प्रधान कोअर कमिटी
कोषाध्यक्ष पदी मा.युनूसजी बागवान.
यांना निवडपत्रे देऊन कार्यरत करण्यात आले.
लवकरच सांगली जिल्ह्यात पत्रकारांच्या बैठकी घेऊन, पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी "द पाॅवर आॅफ मिडिया फौंडेशन पत्रकार संघ, सांगली.'' क्रियाशील होणार असल्याचे बैठकीत सर्वांनूमते जाहीर करण्यात आले..
सांगली जिल्ह्यासाठी निवड झालेल्या,द पाॅवर आॅफ मिडिया फौंडेशनच्या पत्रकार संघाच्या, "प्रधान कोअर कमिटी ''चे स्वागत, अभिनंदन सर्वस्तरावर होत आहे.