*सांगलीतील कृष्णा नदीच्या पात्रात मासे मृत झाल्या प्रकरणी ,तज्ञ अधिकारी समितीच्या अहवालात कारखाने ,नगरपालिका व महापालिका प्रशासन दोषी, राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडे अहवाल* *सादर--*
*जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क*
( *अनिल जोशी)*
सांगलीत कृष्णा नदीच्या पात्रातील पूर्वी लाखो मासे मृत झाल्या प्रकरणी, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या तज्ञ अधिकारी समितीने, राष्ट्रीय हरित न्यायाधीकरणाकडे अहवाल सादर करून, सांगली महानगरपालिका ,नऊ कारखाने व दोन नगरपालिकां यांच्यावर घातक प्रदूषण युक्त पाणी सोडल्याने, मासे मृत झाल्याचा दोषारोप ठेवला आहे. सदरहू तज्ञ समितीने सादर केलेला अहवाल हा 161 पानांचा असून, त्यात सर्व गोष्टींचा मुद्द्यांचा परामर्श घेण्यात आलेला आहे. राष्ट्रीय हरित न्यायाधीकरणाकडे स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी ,त्यांचे वकील ओंकार वांगीकर यांच्यामार्फत याचिका दाखल केली होती .याचिकेच्या सुनावणीनंतर राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने, तज्ञ समिती नेमून अहवाल सादर करण्याचा यापूर्वी आदेश दिला होता. त्यानुसार नुकताच 15 नोव्हेंबरला, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या तज्ञ अधिकारी समितीने अहवाल सादर करून, अहवालात हुतात्मा दूध संघ आणि कारखाना, राजारामबापू दूध संघ आणि कारखाना, आष्टा- इस्लामपूर नगरपालिका, यशवंतराव मोहिते मद्यार्क प्रकल्प व साखर कारखाना, राजारामबापू मद्यार्क प्रकल्प आधी बारा संस्थांच्यावर दोषारोप ठेवण्यात आलेला आहे. स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे, साखर कारखान्यांच्या घातक रसायनियुक्त सांडपाण्यामुळे, कृष्णा नदीतील मासे मृत झाल्याची तक्रार केली होती. आता त्यांच्याच वरिष्ठ तज्ञ समितीच्या अधिकाऱ्यांनी, वरील कारखान्याच्या बाबतीत दोषास्पद अहवाल दिला असल्यामुळे, या सर्व कृष्णा नदीत घातक रसायुक्त पाणी सोडणाऱ्या कारखानदार व संस्थांच्यावर कारवाई होत नाही, तोपर्यंत हा लढा सुरूच राहील असे सांगितले. याचिकाकर्ते सुनील फराटे यांचे वकील एडवोकेट ओंकार वांगीकर यांनी सांगितले की राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडे मांडलेला तज्ञ समितीचा अहवाल हा पुरावानिष्ठ असून, संपूर्ण तपशीलवार वस्तुनिष्ठ आधारित माहिती दिलेली आहे. नदी प्रदूषणाच्या बाबतीत संबंधित सर्व कारखानदार व संस्थानी आता काटेकोरपणे विचार करून, नदी प्रदूषण न होण्यासाठी उपाययोजना करून राबवाव्या लागतील.