*सांगलीत आज लव्ह जिहाद व धर्मांतर विरोधी कडक कायदा करण्यासाठी, 24 डिसेंबर 2022 रोजी सकल हिंदू संघटनांच्या वतीने निघणाऱ्या मोर्चाच्या नियोजनासाठी बैठक संपन्न--*
*जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क*
( *अनिल जोशी* )
देशासह महाराष्ट्रात सध्या हिंदू धर्मातील युवतींना व महिलांना लव्ह जहाद नावाखाली इस्लाम धर्मातील काही फुटीरवादी धर्मांध्य शक्ती कडून विशिष्ट प्रकारे टार्गेट करून त्यांच्याशी विवाह करून त्यांचे बळजबरीने धर्मांतर करून जीवन उध्वस्त करण्याचा नियोजनबद्ध कट संपूर्ण देशभरात फार मोठ्या प्रमाणात सुरू आहे.याला हजारो हिंदू युवती,महिला बळी पडत आहेत. ही घटना कायद्याने इतरांच्या धर्मावरती आक्रमण करणारी असून लोकशाहीला कळंबा फासणारी आहे.
केंद्र सरकारने व महाराष्ट्र सरकारने अशा प्रकारच्या घटना ताबडतोब थांबवण्याच्यासाठी लवजहाद,व धर्मांतर विरोधात तातडीने कायदा करावा.
*या मागणी साठी सांगली शहरातून दि.24 डिसें.रोजी सकाळी 10 वाजता राम मंदिर चौकातून निघणाऱ्या सकल हिंदू हुंकार मोर्च्याच्या नियोजनासाठी बोलावण्यात आलेल्या सर्व हिंदुत्ववादी संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची व्यापक बैठक दि.13 डिसें. रोजी सायंकाळी टिळक स्मारक मंदिर सांगली येथे पार पडली*.
या बैठकीत सकल हिंदू हुंकार मोर्चाची रूपरेषा ठेवण्यात आली, या मध्ये सर्व हिंदुत्ववादी संघटना, सर्व हिंदू धर्मातील समाजाचा सहभाग, शाळा कॉलेज, महानगर क्षेत्रातील सर्व गणेशोत्सव मंडळ, शिवजयंती उत्सव मंडळ, नवरात्र उत्सव मंडळ, सर्व मंदिरातील सेवाभावी भक्त मंडळ, नागरिकांचा मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग होण्याच्या दृष्टीने व्यापक चर्चा व नियोजन करण्यात आले.
या बैठकीत अनेक मान्यवरांनी, तसेच हिंदुत्ववादी सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी हा मोर्चा यशस्वी होण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे मार्गदर्शन केले.या साठी नितीन राजे शिंदे व पै. पृथ्वीराज पवार यांचे नेतृत्वाखाली एक सर्व समावेशक पदाधिकाऱ्यांची कमिटी नेमण्यात आली.असून या माध्यमातून हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी शहरातील विविध ठिकाणी येत्या काही दिवसां मध्ये बैठकीचे आयोजन देखील करण्यात आले आहे.
या बैठकीच्या प्रमुख स्थानी, माजी आमदार नितीन राजे शिंदे, भाजप युवा नेते पै. पृथ्वीराज भैय्या पवार, भाजपा महिला नेत्या सौ.नीताताई केळकर, राष्ट्रीय स्वयं संघाचे सतीश राजमाने, श्रीराम कुलकर्णी, श्रीकांत शिंदे, ऍड.बाळासाहेब देशपांडे, हिंदू एकताचे हनुमंतराव पवार,श्रीकांत शिंदे,अविनाश मोहिते, शिवसेनेचे महेंद्र चांडाळ, दिलीप कांबळे, रंजीत सावंत, रघुनाथ चव्हाण, विजय दादा कडणे, स्वप्निल शहा, ओंकार शुक्ल,अशोक शेट्टी, चंद्रकांत सूर्यवंशी,बाळासाहेब मोहिते, संतोष देसाई, उदय मुळे,निलेश हिंगमिरे, आदीसह. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ,भाजपा, शिवसेना,राष्ट्रीय स्वयं संघ,हिंदू एकता आंदोलन,विश्व हिंदू परिषद, शिवप्रतिष्ठान, शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तान,बजरंग दल, हिंदू जनजागृती समिती, राष्ट्रसेविका समिती तसेच विविध गणेशोत्सव मंडळाचे प्रमुख पदाधिकारी सह असंख्य शिवप्रेमी, हिंदुत्ववादी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सामील होते.