*सांगलीत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार यांचा 82 वा वाढदिवस, विविध उपक्रमांनी साजरा--*
*जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क*
( *अनिल जोशी)*
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खा. श्री. शरदचंद्रजी पवार यांच्या ८२ व्या वाढदिवसानिमित्त सोमवार दि. १२ डिसेंबर २०२२ रोजी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश च्या वतीने व्हर्च्युअल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते . १२ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजल्यापासून सोहळ्याचे थेट प्रक्षेपण महाराष्ट्रात सर्व ठिकाणी समाजमाध्यमांद्वारे दाखवण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली शहर जिल्ह्याच्या वतीने या व्हर्च्युअल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते . सदर थेट प्रक्षेपण सांगली येथे सांगली राष्ट्रवादी कार्यालय( RIT) वसंत कॉलनी , सांगली मिरज रोड सांगली येथे आयोजित करण्यात आले होते.
तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली शहरजिल्ह्याच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबीर व रक्तदान शिबिर तसेच आयुषमान भारत योजने अतंर्गत मोफत स्वास्थ कार्ड रजिस्ट्रेशन शिबीर देखील आयोजित करण्यात आले होते.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे शहरजिल्हाध्यक्ष संजयजी बजाज , युवक शहरजिल्हाध्यक्ष राहुलदादा पवार , महापौर दिग्विजय सूर्यवंशी , पद्माकर जगदाळे , शेखर माने , सागर घोडके , हरिदास पाटील , असिफ बावा, विष्णू माने , शेडजी मोहिते ,योगेंद्र थोरात, स्वाती पारधी , अनिता पांगम , वंदना चंदनशिवे , वैशाली कळके , छाया जाधव ,धनंजय पाटील ,बिरेंद्र थोरात , समीर कुपवाडे , आयुब बारगिर , डॉ शुभम जाधव , उत्तम कांबळे, उमर गवंडी , सुरेश बंडगर , अर्जुन कांबळे , रज्जाक नाईक ,निलेश शहा , विनायक हेगडे , महालिंग हेगडे, अमृता चोपडे , मदन पाटील ,चंद्रकांत नाईक , कुमार वायदंडे , रामभाऊ पाटील , संजय सरवदे , प्रकाश सूर्यवंशी ,विद्या कांबळे , संध्या आवळे , छाया पांढरे ,सुरेखा सातपुते , संगीता जाधव , सुनीता जगधने , शेरु सौदागर ,अक्षय अलकुंटे , संदीप कांबळे , सुमुख पाटील ,आदित्य नाईक अक्षय शेंडगे , अक्षय शेळके , सुभाष तोडकर , रवींद्र कदम ,अरुण चव्हाण , अफजल मुजावर ,नितीन माने , अमित चव्हाण ,नालसाब मुल्ला , इर्शाद पखाली , प्रफुल्ल जाधव ,आशुतोष धोतरे , अमित पाटील ,रुपेंद्र जावळे, आदर्श कांबळे , अमीन शेख , संतोष कांबळे , वैभव गिड्डे पाटील , अभिजित रांजणे,गणेश काळे ,सचिन सगरे , अलुद्दीन शेख ,युवराज ऐवळे , विजय जाधव , पुष्पक चौगुले , रफिक मुलाणी, अमित घाटगे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.