*महाराष्ट्र राज्यातील पुणे ,सातारा, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांना हिवाळ्यात ,जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त.----*
*जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क*
( *अनिल जोशी)*
महाराष्ट्र राज्यात पुणे, सातारा, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांना हिवाळ्यामध्ये ,जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. सद्य परिस्थितीत बंगालच्या उपसागरामध्ये, वादळी प्रभाव फार मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्यामुळे, राज्यात पाऊस पडणार असल्याची शक्यता, हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार वर्तवण्यात आली असून ,उत्तर केरळ आणि कर्नाटकच्या किनाऱ्याजवळ पूर्व मध्यम अरबी समुद्रावर वादळ तयार झाल्यामुळे ,राज्यात मध्यम ते जोरदार पाऊस होण्यासाठी वातावरण निर्मिती झाली आहे. दरम्यान राज्यातील ढगाळ हवामानामुळे, किमान तापमानाचा पारा वाढला आहे. आज कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भामध्ये विजेच्या कडकडाटासह काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली असून, त्यामुळे सोमवारी दिवसभर महाराष्ट्र राज्यात ढगाळ वातावरण पाहायला मिळालं. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार कोकणातील रायगड, रत्नागिरी ,मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर ,पुणे, सातारा या जिल्ह्यामध्ये अनेक भागात ,जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे .सध्याच्या पावसाळी स्थितीतील वातावरणात, बदल झाल्यानंतर, पुढील दोन दिवसात राज्यातील तापमानात दोन-चार अंशानी घट पुण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. आज हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, चक्रीवादळाचा जोर ओसरला असून, उत्तर केरळ व तामिळनाडू वरच्या हवेच्या मधल्या स्तरात, चक्राकार स्थितीचे वारे कायम असून, ते पश्चिमेकडे सरकत केरळ- कर्नाटक किनारपट्टीवर अरबी समुद्रात ,कमी दाबाच्या क्षेत्राच्या रूपात रूपांतरीत होण्याची शक्यता आहे. दरम्यान 13 डिसेंबर नंतर भारतीय भूभागावर कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम, नाहीसा होण्यास सुरुवात होईल. राज्यात विदर्भात सुद्धा काही ठिकाणी, हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे.