*सांगलीत कृष्णा महापूर नियंत्रण नागरिक कृती समितीची बैठक होऊन ,अलमट्टी धरणाच्या उंची वाढवल्यास आंदोलनाचा इशारा- समिती नियंत्रक सर्जेराव पाटील*.
*जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क*
( *अनिल जोशी* )
सांगलीत आज कृष्णा महापूर नियंत्रण नागरिक कृती समितीची एक व्यापक बैठक संपन्न झाली. त्यात प्रामुख्याने कृष्ण महापूर नियंत्रण नागरिक कृती गेली तिन वर्षे सातत्याने कृष्णा महापूर सारखा गंभीर विषयाकडे अभ्यास करुन व सध्याच्या परिस्थितीनुसार कर्नाटक अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याबाबत आक्रमक असून सध्याची उंची 519.60 मीटर असल्याने ती उंची आता वाढवून 524.256 मीटर करणार आहे, त्याबद्दल सविस्तर चर्चा झाली. त्यासाठी कर्नाटक शासनाने बरेच प्रयत्न केले आहेत. केंद्र सरकार दोन राज्याचे प्रश्न मिटवण्यासाठी आग्रही असून, येत्या काही दिवसात हे प्रश्न मिटवण्याच्या दृष्टीने प्रयत्न होतील, त्याच प्रमाणे कर्नाटकात होऊ घातलेल्या निवडणुकांमुळे काही अमीषे दिले जातील. काही घटनाबाह्य निर्णय घेतले जातील, तसे ठराव केले जातील, आणि त्याचा महाराष्ट्राला फार मोठे नूकसान होईल. सांगली, कोल्हापूर, गावे, तालुके पूर्णपणे पाण्याखाली जाईल अशी भीती वाटत आहे. असे मत कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समिती निमंत्रक सर्जेराव पाटील यांनी व्यक्त केले.या वेळी समितीची आज बैठक बोलावली होती.
अलमट्टीची उंची वाढवू नये म्हणून महाराष्ट्र आणि तेलंगणा या दोन्ही राज्यांनी कंबर कसली असून तेलंगणा राज्याने हायकोर्टात केस दाखल केले आहे. ती अजून हायकोर्टात प्रलंबीत आहे. त्याच बरोबर केंद्रीय जल आयोगाने सुद्धा कोणतीही परवानगी आलमट्टी उंची वाढवण्यासाठी मंजुरी दिली गेली नाही. म्हणून महाराष्ट्र राज्यातील राजकीय नेत्यांनी शांत न राहता संदर्भी महापूर सारख्या गंभीर विषयाकडे गांभीर्याने घेतले पाहिजे आणि केंद्राच्या आणि कर्नाटकाच्या मध्ये होणाऱ्या चर्चेवर लक्ष ठेवले पाहीजे, काही सामंजस करार होण्याची शक्यता असून त्या कडे लक्ष दिले पाहीजे.
कर्नाटक राज्याने विकास साधला पाहीजे हे बरोबर आहे. पण मागील व पुढील राज्याची जबाबदारी घेणार का ? त्या उंची वाढवल्यामुळे महापुराच्या काळात वाढणाऱ्या पाण्यामुळे जनावरे, जलचर, शेती, घरे, जनजीवित्व विस्कळीत होणार आहे.सन २०२२ चा फुगवटा हा जनतेच्या निदर्शनास आणून दिला आहे. अल्लमटी आता फुगवटा नाही हे म्हणू शकत नाही. म्हणूनच महापूर टाळण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व मंत्र्यांनी एकत्र येणे गरजेचे आहे. आणि कर्नाटक सरकारला प्रखरतेने ही उंची वाढू नये याकडे लक्ष दिले पाहिजे, नाहीतर या साठी संपूर्ण कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील नागरिक उठाव केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. गरज पडल्यास आंदोलनाच्या मार्गातून आम्ही हा प्रश्न सोडवू असे या ठिकाणी मत व्यक्त केले. या बैठकीला सर्व कृष्णा महापूर समितीचे सदस्य जलअभ्यासक विजयकुमार दिवाण, प्रभाकर केंगार, प्रदिप वायचळ, संजय कोरे, दिनकर पवार, पि.पी.माने, सचिन सगरे, आदी उपस्थित होते.