*महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व इतर नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर पुकारण्यात आलेल्या पुणे बंदला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद --*
*जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क*
( *अनिल जोशी* )
पुण्यात आज विविध पक्षांच्या व संघटनांच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदला ,उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दुपारपर्यंत पुण्यातील मुख्य रस्त्यावर शुकशुकाट झाला होता. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ,भाजपचे नेते व मंत्री चंद्रकांतदादा पाटील, प्रसाद लाड, तसेच इतर नेते यांच्या वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस व विविध संघटनांच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदला, आज उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.
पुण्यातील आजच्या बंदला व्यापारी संघटना, अडत व्यापारी वगैरेनी पाठिंबा दिला होता. विशेष बाब म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना या बंदमध्ये सहभागी झाली नव्हती. आज विविध पक्षांच्या व संघटनेच्या वतीने निघालेल्या मोर्चा खासदार छत्रपती उदयनराजे, शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे, दीपक मानकर, अरविंद शिंदे, प्रशांत जगताप ,मोहन जोशी, आमदार सुनील टिंगरे, दीप्ती चौधरी, संगीता तिवारी, अंकुश काकडे, रूपाली पाटील ,अजित दरेकर, संजय बालगुडे, संतोष शिंदे ,राजेंद्र कुंजीर, विकास पासलकर आदी मान्यवर मूक मोर्चात सहभागी व उपस्थित राहिले होते. सकाळी ठीक 11:00 वाजता, पुण्यातील डेक्कन जिमखाना येथे ,छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास खासदार उदयनराजे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून ,मूकमोर्चास प्रारंभ झाला. सदरहू मूक मोर्चा डेक्कन जिमखाना- टिळक चौक मार्गे लक्ष्मी रस्त्याने- शुगुन चौक -नगरकर तालीम चौक- बेलबाग चौक मार्गे लाल महाला जवळ येऊन, मूक मोर्चाची सांगता लाल महाला जवळील जिजामाता चौकात झाली.