*सांगलीत आज जिल्हा व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने, भारतीय जनता पार्टीचे नेते व मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात निषेध आंदोलन ---*
*जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क*
( *अनिल जोशी* )
सांगलीत आज जिल्हा व शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने, भारतीय जनता पार्टीचे नेते व मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्राच्या महापुरुषांचा जो अवमान केला आहे, त्याच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले. भारतीय जनता पार्टीचे नेते व मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्राच्या महापुरुषांचा अवमान केला आहे. महाराष्ट्राची ओळख ही छत्रपती शिवरायांचा, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा महाराष्ट्र म्हणून जगभरात आहे. त्या महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भीक मागून शाळा चालवल्या, अशा प्रकारचे अवमानजनक वक्तव्य पुण्याचे वाचाळवीर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. अशा प्रकारचे चुकीचे वक्तव्य करत चंद्रकांत पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांचा अवमान केला आहे. या वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर हे आंदोलन करण्यात आले
यावेळी "चंद्रकांत पाटील मुर्दाबाद" , "चंद्रकांत पाटील हाय हाय" , "चंद्रकांत पाटील यांचे करायचे काय..? खाली डोकं वर पाय" , "वाचाळविर भाजपचा धिक्कार असो" , अशा प्रकारच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला.
यावेळी राष्ट्रवादी चे शहरजिल्हाध्यक्ष मा. संजयजी बजाज म्हणाले की , गेल्या दोन तीन महिन्यांपासून वारंवार भाजप च्या नेत्यांकडून महापुरुषांबद्दल चुकीचे वक्तव्य होत आहेत , इथून पुढे कुठल्याही राष्ट्रपुरुषांचा अवमान सहन केला जाणार नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या विरोधात आणखी तीव्र स्वरूपाच्या आंदोलन करेल असा इशारा देखील देण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी चे शहरजिल्हाध्यक्ष संजयजी बजाज , महापौर दिग्विजय सुर्यवंशी , सागर घोडके ,उत्तम कांबळे , असिफ बावा , अनिता पांगम , वंदना चंदनशिवे ,आयुब बारगिर , डॉ शुभम जाधव , बिरेंद्र थोरात , उमर गवंडी , जुबेर चौधरी ,स्वाती पारधी , आकाराम कोळेकर , अक्षय अलकुंटे , मदन पाटील , विनायक हेगडे , महालिंग हेगडे ,अमृता चोपडे , संध्या आवळे , विद्या कांबळे ,सुरेखा हेगडे , सुनीता जगधने, संगीता जाधव ,शितल मद्रासी , सुभाष तोडकर , अज्जू पटेल ,मुन्ना शेख , रोहन भंडारे , संतोष कांबळे , राहुल यमगर ,आदित्य नाईक , अमित चव्हाण , रुपेंद्र जावळे , जुबेर मुजावर , अजरुद्दीन जमादार , सचिन सगरे , राकेश कांबळे , सचिन लाड , बी.बी. माने .आदी पदाधिकारी उपस्थित होते .