शांतता कमिटी / मोहल्ला कमिटी बैठक / महिला दक्षता कमिटी .
प्रतिनिधी: मिलिंद पाटील
रमजान सण,रामनवमी आदी धार्मिक सण, उत्सवासह श्रीजोतिबा यात्रा,महात्मा जोतिबा फुले,डॉ बाबासाहेब आंबेडकर आदी महापुरुषांच्या जयंती तसेच सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्टद्वारे होणारा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न यामुळे जातीय तेढ निर्माण होवु नये यासाठी सर्वांनी सजग राहणे गरजेचे असल्याचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी सांगितले.तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये,अशावेळी पोलिसांना मदत करण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे यासाठी शांतता कमिटीच्या सदस्यांनीही पुढाकार घ्यावा असे आवाहनही पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांनी यावेळी केले.यावेळी शांतता कमिटीच्या सदस्यांनीही पोलिसांना मदत करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी उदय गायकवाड, संजय पाटील,अकबर मोमीन,जावेद सनदी,सरलाताई पाटील,संगीता खाडे,कमल पाटील,अर्चना मेढे, मंगल पाटील, रुपाली कुंभार,सविता रायकर,निर्मला सालढाना, मंजुषा जोशी आदी शांतता कमिटीचे सदस्य तसेच गोपनीय विभागाचे सुनील जवाहिरे ,साजिद गवंडी उपस्थित होते.