*सांगलीत आज जिल्हा काँग्रेस पक्षाच्या वतीने गॅस, पेट्रोल, विज दरवाढी विरोधात तसेच जुनी पेन्शन लागू करण्यासाठी, सरकारच्या विरोधात एक मोठे आंदोलन छेडण्यासाठी बैठक संपन्न--*
*जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क*
( *अनिल जोशी* )
काँग्रेस पक्षाच्या वतीने भाजप सरकार विरोधात, गॅसचे दर वाढलेत, पेट्रोल -डिझेल दर वाढलेत, वीजदर वाढलेत, त्या विरोधात तसेच जुनी पेन्शन योजना, महाराष्ट्र सरकारने चालू करावी यासंदर्भात सांगलीमध्ये एक मोठे आंदोलन छेडण्यासाठी व त्याच्या नियोजनासाठी आज काँग्रेस भवन येथे, काँग्रेस अंतर्गत सेल व संघटना च्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. सदर बैठकीमध्ये मोठा प्रचंड मोर्चा सांगली मध्ये आयोजित करण्यासाठी, सर्व नेतेमंडळींना आमंत्रित करून ,त्यांच्या नेतृत्वाखाली व काँग्रेस पक्षाच्या झेंड्याखाली ,सदरचा मोर्चा काढण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे असे प्रतिपादन सदरच्या बैठकीत शिक्षक सेलचे प्रदेश कार्याध्यक्ष एन .डी. बिरनाळे यांनी व्यक्त केले .स्वागत प्रास्ताविक अजित ढोले यांनी केले.
यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षाच्या वतीने मोर्चा हा घ्यावाच, परंतु काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण करण्यासाठी जे राहुल गांधी यांनी जो आदेश दिलेला आहे," हात से हात जोडो" या अभियानाचा कार्यक्रम, सर्व तालुक्यांमध्ये जाऊन सर्व संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी आपापल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करावे .त्याच पद्धतीने जनतेच्या प्रश्नावर या पुढील काळामध्ये, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर, बेरोजगारी बाबत आवाज उठवावा असे सांगितले. यावेळी एसटी इंटॅक्ट युनियनचे डी.पी. बनसोडे, अरविंद जयनापुरे ,रवींद्र वळवडे, ओ.बी.सी.सेल चे अशोक सिंग राजपूत, अल्पसंख्यांक सेलचे देशभूषण पाटील, भागगुंडा पाटील, भिलवडीचे राजू पाटील, कासेगाव चे विजय पाटील ,अरुण पळसुले, श्रीधर बारटक्के, कांचन खंदारे, प्रकाश माने ,नामदेव पठाडे, विश्वास यादव ,रवींद्र पाटील, मौलाली वंटमोरे, सीमा कुलकर्णी, जन्नत नायकवडी, शमशाद नायकोडी, सुभाष पट्टणशेट्टी पैगंबर शेख, राजू भोरे ,सुरेश गायकवाड, हरीश पुजारी इत्यादी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सदरच्या मोर्चा बरोबरच जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा व चिंतन शिबिर आयोजित करण्यासंदर्भात नेतेमंडळींच्या उपस्थितीमध्ये मीटिंग घेण्याचे ठरवण्यात आले.