जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
( अनिल जोशी )
भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुणे शहरासह आसपासच्या भागात ,काल अचानक अवकाळी पावसाचे आगमन झाले. याशिवाय पुढील दोन ते तीन दिवस पुणे शहरासह आसपासच्या भागात अवकाळी पाऊस होण्याची संकेत, हवामान खात्याने व्यक्त केलेले आहेत. आज संध्याकाळी 7:30 वाजण्याच्यावेळी, पुणे शहरात व आसपासच्या भागात, अचानक पावसाळा सुरुवात होऊन, कोथरूड, टिळक रोड, गरवारे कॉलेज, सदाशिव पेठ, नवी पेठ, धानोरी, दांडेकर पूल, नारायण पेठ, भैरवनगर ,विश्रांतवाडी ,टिंगरे नगर, लोहगाव, सारसबाग ,सेनापती बापट रोड ,एरंडवणे ,औंध, सिंहगड रोड आदी ठिकाणी पाऊस झाल्याचे वृत्त आहे. आजच्या होळी सणाच्या दिवशी अचानक आलेल्या पावसामुळे होळी सणाच्या होळी पेटवण्यावर व उत्साहावर फार मोठा परिणाम झाल्याचे दिसून आले. पुणे शहरात व आसपासच्या भागात, आज दिवसभर कमालीची गर्मी वातावरणात जाणवत होती. त्याचवेळी सायंकाळच्या 7:30 वाजण्याच्या सुमारास, अचानक अवकाळी मेघगर्जनेसह आलेल्या पावसामुळे शहरवासीयांची फार मोठी दैना उडाली. राज्यात काही ठिकाणी आसपासच्या भागात, शेतकरी या अचानक अवकाळी आलेल्या पावसाच्या अस्मानी संकटाशी तोंड देत असून, काही ठिकाणी हातचे तोंडाशी आलेले पीक गमावून बसल्याचे चित्र दिसत आहे. काही ठिकाणी गारपीट झाल्याचे सुद्धा चित्र दिसत असून ,यामध्ये शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे. धुळ्यामध्ये सुद्धा विशेषतः खोरी भागात गारपीट झाल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास निसर्गाच्या अवकृपेने हिरावून नेला असल्याचे चित्र आहे.