जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
( अनिल जोशी )महाराष्ट्र राज्यात येत्या 5 वर्षात रेल्वे फाटक मुक्त अभियाना अंतर्गत, उड्डाणपूल योजना जाणार असल्याचे प्रतिपादन, केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूर येथे कार्यक्रमांमध्ये बोलताना केली. महाराष्ट्र राज्यातील नागपूर येथे अजनी गावात ,महाराष्ट्र शासन व रेल्वे मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमान्वये, सुमारे 306 कोटी रुपयांच्या, 6 उड्डाणपूल लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ,तसेच 600 कोटी रुपयांच्या उड्डाणपूलांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम, केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले, याप्रसंगी ते बोलत होते.
दरम्यान राज्यात व देशात, रेल्वे फाटकमुक्त अभियानांतर्गत उड्डाणपूल योजना राबवण्यासाठी, केंद्रीय रस्ते निधीतून सुमारे 16000 कोटी रुपयांची तरतूद पुढील काळात केली जाईल असे आश्वासित केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केले. महाराष्ट्र राज्यात रेल्वेच्या पायाभूत सुविधांचे रूप बदलण्यासाठी तसेच जनतेच्या पैशाची इंधनाची बचत होण्यासाठी, रेल्वे फाटक मुक्त अभियाना अंतर्गत, 100 उड्डाण पुलांची उभारणी, महारेल करणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केले.नागपूर मध्ये चालू असलेल्या विविध विकास कामांच्या योजनांची माहिती ही, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना अवगत केली.