जनप्रतिसाद न्यूज नेटवर्कः
( अनिल जोशी )महाराष्ट्र राज्यात यंदा साखरेचे उत्पादन कमी झाले असून, साखरेचा उतारा कमी झाल्याने उत्पादनात घट आली आहे. मागील वर्षीचा साखरेचा उतारा 10. 42% असून, तो यंदाच्या वर्षी 9.48% इतक्यां पातळीवर घसरला आहे. महाराष्ट्रातील यंदाच्या वर्षीचा साखरेचा हंगाम जवळपास हा संपत आला असून ,जवळपास यंदाच्या वर्षीच्या हंगामात 10 कोटी 19 लाख 30,000 मॅट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण केले असून ,1 कोटी 48 लाख 82000 क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.
दरम्यान राज्यातील उस्मानाबाद ,बीड ,सातारा, जालना,सोलापूर येथील सहकारी साखर कारखान्यांचे गाळप अद्यापी सुरू असून, जवळपास महाराष्ट्र राज्यातील 204 साखर कारखान्यांचे गाळप बंद झाले आहे, अशी माहिती साखर आयुक्त यांनी दिली. महाराष्ट्र राज्यात खोडवा जास्त असल्यामुळे, ऊस नवीन लागवड कमी झाली आहे. त्याचप्रमाणे उसाची गाळप क्षमता चांगल्या प्रमाणात झाली असली तरी, उत्पादन क्षमतेमध्ये कमी दिसत आहे. सध्याच्या अवकाळी पावसाच्या बदलत्या स्वरूपामुळे, काही राज्याच्या ठिकाणी, शेतकऱ्यांच्या मशागती करण्यावर सुद्धा परिणाम झाला होता, त्यामुळे उत्पादन क्षमता कमी झाली आहे .काही जिल्ह्याच्या ठिकाणी उसाची तोडणी लवकर केली असल्याने ,त्याचा सरळ सरळ परिणाम साखरेच्या उताऱ्यावर झाला आहे. एकंदरीत राज्यातील सहकारी साखर कारखान्यांचे गाळप बंद होत असल्याने साखर उद्योग काही काळाच्या विश्रांतीवर जाणार आहे.