जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
सध्या पुण्यातील अनेक लोक प्रवासासाठी जाण्या येण्यासाठी इतर घरगुती कामासाठी ओला व उबेर रिक्षाचा वापर करत आहेत. ओला व उबेर रिक्षाचा पर्याय हा प्रवासासाठी स्वस्त व चांगली सेवा पुरवण्यासाठी होतो.पुणेकर नागरिक सर्वात जास्त प्राधान्य ओला- उबेर रिक्षाला देत असतात. मात्र आता पुण्यातील ओला व उबेर रिक्षा प्रवास बंद होणार असल्याचा प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या झालेल्या बैठकीत नुकताच निर्णय घेण्यात आला असल्याचे वृत्त आहे .
मोटार वाहन समुच्चयक मार्गदर्शक सूचना 2020 नुसार, आवश्यक बाबींची पूर्तता होत नसल्याने मेसर्स आणि टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड पुणे, मेसर्स उबेर इंडिया सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड पुणे, मेसर्स कीवोल्युशन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड पुणे, मेसर्स रोपण ट्रान्सपोर्टेशन सर्विस प्राइवेट लिमिटेड पुणे या चार कंपन्यांना, तीन चाकी रिक्षांचे ॲग्रीगेटर लायसन्स, पुणे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने नाकारले आहे. पुणे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाकडे मोटार व्हेईकल ॲग्रीगेटर गाईडलाईन्स 2020 मधील तरतुदीनुसार, वरील 4 ही कंपन्यांकडून अर्ज केले गेले होते. तथापि 4 ही कंपन्यांचे ऑटोरिक्षा संवर्गात, ॲग्रीगेटर लायसन्स नाकारण्याचा निर्णय, पुणे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने घेतला आहे. त्याबरोबरच मेसेज आणि टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड व मेसर्स उबेर इंडिया सिस्टीम्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या 4 चाकांच्या हलकी मोटर वाहने संवर्गासंदर्भात, ॲग्रीगेटर लायसन्स जारी करणे बाबत शासनाकडून योग्य ते मार्गदर्शन घेण्याचा निर्णय, पुणे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने घेतला आहे अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी दिली आहे.
एकंदरीतच पुण्यातील उबेर व ओला रिक्षा 3 चाकी रिक्षांचे ॲग्रीगेटर लायसन्स पुणे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने नाकारल्याने, पुणेकरांच्या ओला व उबेर रिक्षा प्रवासासाठी फार मोठी गैरसोय व अडचण होणार आहे.