जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
( अनिल जोशी )
आज मुंबईमध्ये मास्टर दिनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान तर्फे यंदाच्या वर्षीचा दिला जाणारा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार, ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना देण्यात येणार आहे अशी घोषणा करण्यात आली आहे .
संगीत, नाटक, कला व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या प्रतिष्ठित व्यक्तीला, लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार देण्यात येतो. लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार हा, गेली दोन वर्षे देण्यात येत असून, त्याबरोबरच मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कारही जाहीर झाले आहेत. येत्या 24 एप्रिल 2023 वार सोमवार रोजी, मुंबईत पुरस्काराचे वितरण होणार आहे. मागील वर्षी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना, पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार देऊन, सन्मानित करण्यात आले होते. देशातील संगीत ,नाटक ,कला तसेच सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केल्या जाणाऱ्यांना ,लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार देण्यात येत असून ,या पुरस्काराचे स्वरूप फार मोठे असून, हा पुरस्कार मिळणे म्हणजे कलेच्या क्षेत्रातील भाग्य म्हणावे लागेल.