जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
कोल्हापुरातील पितळी गणपती जवळ, ताराबाई पार्क मधील हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना येथे, मोफत महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आज सकाळी या शिबिराचे उद्घाटन प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. कोल्हापुरातील ताराबाई पार्क येथील हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना येथील महाआरोग्य तपासणी केंद्रात, जवळपास 242 रुग्णांना तपासण्यात आले असून, यामध्ये मेडिसिन विभाग 46, अस्थिविंग तज्ञ विभाग 27, बाल विभाग 25 ,स्त्रीरोग विभाग 22, जनरल सर्जरी विभाग 10, नेत्ररोग विभाग 45, रक्तदाब 23, मधुमेह 34 आदी रुग्णांच्या तपासण्यांचा यात समावेश आहे.
आपला दवाखाना महाआरोग्य शिबिर केंद्रामध्ये झालेल्या तपासणीसाठी तज्ञ डॉक्टर म्हणून, वैद्यकीय अधिकारी डॉ. पुलकित खंबायते ,डॉ. सुनीता पाटील, बालरोग तज्ञ डॉ.रुचिका यादव, डॉ. मंदार पाटील ,स्त्री रोग तज्ञ डॉ. सुरेखा आडनाइक, सर्जन डॉ. आशा जाधव, अस्थिरोग तज्ञ डॉ. अशोक जाधव ,चेस्ट फिजिशियन डॉ. रूपाली दळवी व नर्सिंग स्टाफ आदी कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
यावेळी उपायुक्त विक्रांत अडसूळ आरोग्य अधिकारी डॉ. रमेश जाधव, सावित्रीबाई फुले रुग्णालयाचे प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश पावरा, पंचगंगा रुग्णालयाच्या प्रसासकीय वैद्यकीय अधिकारी डॉ.विद्या काळे- हेरवाडे, नोडल ऑफिसर डॉ. अमोल माने आदी वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.