जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष म्हणून डॉ. मनोज सोनी यांनी नुकतीच, पद व गोपनीयतेची शपथ घेतली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या ज्येष्ठ सदस्या स्मिता नागराज यांनी त्यांना शपथ दिली. केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष म्हणून नियुक्त झालेल्या डॉ. मनोज सोनी यांनी 28 जून 2017 रोजी आयोगाचे सदस्य म्हणून कार्याला आरंभ केला. केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष डॉ. मनोज सोनी हे आंतरराष्ट्रीय नातेसंबंधांच्या अभ्यासात्मक विषयात, विशेष प्राविण्य मिळवले असून, " शीतयुद्ध पश्चात काळात आंतरराष्ट्रीय व्यवस्थेतील स्थित्यंतर आणि भारत- अमेरिका संबंध "या विषयावर डॉक्टररेट मिळवलेले पहिलेच भारतीय केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आहेत. गुजरात मधील बडोदा येथे एम .एस. महाविद्यालयाचे उपकुलगुरू म्हणून त्यांनी एकदा आणि गुजरात मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्त विद्यापीठाचे उपकुलगुरू म्हणून दोन वेळा अशी एकूण 3 वेळा त्यांनी उप कुलगुरू म्हणून कार्यभार व जबाबदारी सांभाळलेली आहे.