जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
महाराष्ट्र राज्यातील आज अनेक जिल्ह्यांमध्ये कमाल तापमानात पारा वाढला असून, जवळपास 40 अंश सेल्सिअस पार केलेला आहे. कोकणात, मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, तारीख 11 मे व 12 मे 2023 रोजी, पश्चिम बंगाल, बिहार, गुजरात आणि महाराष्ट्रात उष्णतेची लाट कायम राहणार आहे. राज्यात आज ठीक ठिकाणी आलेल्या वृत्तानुसार, बहुतेक जिल्ह्यातील तापमान 40° पेक्षा अधिक नोंदवण्यात आले असून, बहुतेक जिल्ह्यातील तापमान वाढ दाखवत आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये तापमान 40°c च्या पार झाले असून ,सर्वात जास्त तापमान आज अकोला आणि वर्धा या ठिकाणी सर्वाधिक म्हणजे 43°c तापमानाची नोंद झाली आहे.
आज राज्यातील प्रमुख जिल्ह्यातील तापमानाची नोंद खालील प्रमाणे.-- सोलापूर 41.5°अंश सेल्सिअस, कोल्हापूर 37.1 अंश सेल्सिअस, बारामती 40 अंश सेल्सिअस, नाशिक 40.7 अंश सेल्सिअस, महाबळेश्वर 33.5 अंश सेल्सिअस, अलिबाग 36 अंश सेल्सिअस, सातारा 39.3 अंश सेल्सिअस, जळगाव 44.86 अंश सेल्सिअस, छत्रपती संभाजी नगर 41.4 अंश सेल्सिअस, सांगली 38.5 अंश सेल्सिअस, उदगीर 38.3 अंश सेल्सिअस,ठाणे 39.9 अंश सेल्सिअस, रत्नागिरी 34.8 अंश सेल्सिअस, पुणे 41 अंश सेल्सिअस, सांताक्रुज 36.9 अंश सेल्सिअस, नांदेड 42.8 अंश सेल्सिअस, धाराशिव 40.6 अंश सेल्सिअस, जालना 42.8 अंश सेल्सिअस, बीड 41.9 अंश सेल्सिअस अशी तापमानाची नोंद झाली आहे.