जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज ,गुजरात दौऱ्यावर रवाना झाले असून, सुमारे 4400 कोटी रुपयांच्या प्रकल्पाचा शुभारंभ, त्यांच्या हस्ते होणार आहे. केंद्र सरकारच्या गृहनिर्माण योजनेअंतर्गत 19000 लाभार्थ्यांना घरांचे वाटप समारंभ, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी गुजरातला होणार आहे. पंतप्रधान कार्यालयाने( पी एम ओ) जारी केलेल्या निवेदनानुसार, पंतप्रधान मोदी गांधीनगर मधील, अखिल भारतीय शिक्षा संघ अधिवेशनाला उपस्थित राहणार असून, गिफ्ट सिटीलाही भेट देतील. आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरात दौऱ्यावर असताना, सुमारे 2450 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पाचे उद्घाटन व पायाभरणी समारंभ, गांधीनगर येथे कार्यक्रमादरम्यान होणार आहे, असे पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
गुजरात मध्ये होत असलेल्या विकास कामांच्या उद्घाटनामध्ये, नगर विकास विभाग ,पाणीपुरवठा विभाग, रस्ते आणि वाहतूक विभाग, खाण आणि खनिज विभाग आदी प्रकल्पांचा समावेश असून, दिवसभर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे उद्घाटन समारंभ ,शुभारंभ कार्यक्रम, पायाभरणी समारंभ आदी कार्यक्रमात व्यस्त असतील .केंद्र सरकारच्या गृह निर्माण योजनेअंतर्गत, प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना, नवीन घरांच्या चाव्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुपूर्द केल्या जातील. या प्रधानमंत्री आवास योजनेच्या शहरी आणि ग्रामीण लाभार्थ्यांच्या प्रकल्पासाठी एकूण खर्च 1950 कोटी रुपये आला आहे. एकंदरीत गुजरात दौऱ्यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे दिवसभर उद्घाटनाच्या, शुभारंभाच्या, पायाभरणी समारंभाच्या कार्यक्रमात मग्न असतील.