जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
महाराष्ट्र राज्य सरकारने राज्याच्या सर्व जिल्ह्यात म्हणजे 36 जिल्ह्यात तसेच 288 विधानसभा मतदारसंघात, सार्वत्रिकपणे 06 मे 2023 पासून 06 जून 2023 पर्यंत, छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचे आयोजन करण्यात आले असून ,युवकांना करिअर विषयक विविध संधींचा, योजनांच्या माहितीचा या शिबिरातून सविस्तर मार्गदर्शनात्मक सल्ला देण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.
महाराष्ट्र राज्यातील युवाशक्तीला करियर विषयक मार्गदर्शन करण्यासाठी, या शिबिराचा फार मोठा उपयोग होणार आहे .महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील ,शहरी भागातील विद्यार्थ्यांनी, पालकांनी या शिबिरात सहभागी व्हावे असे आवाहन राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले आहे. राज्यातील 10 वी नंतरच्या विद्यार्थ्यांना करिअरचे मार्ग कसे निवडावे ?विविध विषय कसे निवडावेत? याचे सविस्तर मार्गदर्शन या शिबिरात देण्यात येणार असून, परदेशातील उच्च शिक्षण संधीचा फायदा व्हावा या हेतूने ,मार्गदर्शनपर सल्ला या शिबिरात देण्यात येणार आहे.
राज्यातील सर्व युवा 10 वीच्या विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेऊन, स्वतःचे करिअर उज्ज्वल होण्यासाठी, स्थानिक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेशी, आयटीआय शी संपर्क साधावा असे राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले आहे .विशेषतः ग्रामीण भागातील 10 वी नंतरच्या विद्यार्थ्यांना उपलब्ध असलेल्या शैक्षणिक संधींचा, शैक्षणिक विभागातील करिअरचा, परदेशातील असलेल्या सुवर्णसंधीचा लाभ कसा घ्यावा? यासाठी या शिबिराचे आयोजन राज्य सरकारने केले असल्याचे राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी म्हटले आहे.