जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले यांचा सांगली दौरा निश्चित झाला असून, मंगळवार दि. 9 मे 2023 रोजी दुपारी सातारा येथून सांगली कडे प्रयाण व दुपारी 1:30 वाजता इस्लामपूर मध्ये आगमन होत आहे. दुपारी ठीक 2:00 वाजता ,प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाने आयोजित केलेल्या मेळाव्यास उपस्थित राहणार असून, स्थळ -राजारामबापू नाट्यगृह, तहसीलदार कार्यालयाजवळ ,इस्लामपूर येथे मेळावा होणार आहे. सायंकाळी ठीक 5:00 ते 5:30 वाजता इस्लामपूर येथे, काँग्रेस नेत्यांच्या व कार्यकर्त्यांच्या बरोबर भेटीगाठी. सायंकाळी ठीक 6:30 वाजता, सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी येथे आगमन , नेत्यांच्या व कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी. सायंकाळी ठीक 7:00 वाजले पासून 8:00 वाजेपर्यंत ह. भ. प. विठ्ठलराव पाटील (काकाजी) यांचे कडे राखीव कार्यक्रम आहे. रात्रो ठीक 9:30 वाजता सांगली येथून ,महालक्ष्मी एक्सप्रेस ने मुंबईकडे प्रयाण होत आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले यांचा सांगली दौऱ्यामुळे नेत्यांच्या व कार्यकर्त्यांच्या मध्ये एक उत्साहवर्धक वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले हे सांगली दौऱ्यावर असताना, सध्याच्या राजकीय घडामोडी बाबत कोणते वक्तव्य करतील ? याबाबतीत मोठी उत्सुकता असेल.