जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
विनाशकारी प्रकल्प कोकणाच्या माथी मारण्याचा हुकूमशाही वृत्तीने कराल तर, तो प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरी येथे दिला. बल्क ड्रग पार्क, वेदांता फॉक्स कॉन प्रकल्प, यासारखे प्रकल्प गुजरातला नेता आणि विनाशकारी प्रकल्प कोकणाच्या माथी मारण्याचा प्रयत्न करीत आहात, पण यापुढे जर सरकारने हुकूमशाही पद्धतीने रिफायनरी प्रकल्प, कोकणाच्या माथी मारण्याचा प्रयत्न केला, तर ती हुकूमशाही तोडून- मोडून टाकल्याशिवाय राहणार नाही, असा निर्वाणीचा इशारा उद्धव ठाकरे यांनी शिंदे- फडणवीस सरकारला दिला आहे.
आज ते राजापूरच्या सोलगाव येथील रिफायनरी विरोधक ग्रामस्थांना भेटल्यानंतर, ग्रामस्थांशी संवाद साधताना बोलत होते. सोनगावच्या बारसू रिफायनरी प्रकल्प विरोधातील लढ्यात, आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी असून ,तुम्ही कोणतीही काळजी करू नका. कोकणातील ग्रामस्थांचे मुडदे पाडून जर विकास करायचा प्रयत्न केला, तर तो यशस्वी होऊ देणार नाही, असे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. सोनगाव येथील बारसू रिफायनरी प्रकल्पाबाबत सुरुवातीला, या ठिकाणी प्रकल्प होण्यासाठी मी पत्र दिले होते ,परंतु याचा अर्थ बारसू येथेच प्रकल्प करा, लोकांना भिकारी करा, पण रिफायनरी करा असा अर्थ होत नाही .यापूर्वी नाणार प्रकल्पाला देखील आम्ही विरोध केला होता. बारसू मध्ये सध्या आंब्या- काजूच्या बागा असून, तिथे माणसं राहतात. त्यामुळे तेथील माणसांना जर रिफायनरी प्रकल्प नको असेल तर, तेथे प्रकल्प अजिबात होता कामा नये असे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. बारसू येथील ग्रामस्थांशी चर्चा करून मार्ग काढावा लागेल, स्थानिक लोकांचा जर विरोध असेल तर ,तेथे रिफाईन प्रकल्प अजिबात होता कामा नये पाहिजे. चांगल्या प्रकल्पाला कोकणी माणसाने कोकणात कधीच विरोध केला नाही, परंतु सभोवतालच्या परिसराची प्रकल्पाच्या नावाने राख रांगोळी करून ,विनाशकारी प्रकल्प जर कोकणच्या माथी मारले जात असतील ,तर तो प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही असे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.