जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
येत्या आगामी दिवसात भारतीय जनता पार्टीच्या समोर, सर्व विरोधी पक्षांची एकजूट उभा करून, सक्षम पर्याय दिला जाणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे .राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज, विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
आजच्या परिस्थितीत देशात सर्वात जास्त बिगर भाजपा पक्षांची सरकारे असून, कर्नाटकात देखील काँग्रेस पक्षाची सत्ता येणार असल्याचे, ओपिनियन पोल वरून समजत आहे .राज्यात उभा करण्यात येणाऱ्या सर्व प्रकल्पांचे स्वागत असावं, मात्र असे प्रकल्प उभारत असताना स्थानिक ग्रामस्थांना विचारात घेऊन उभारले जावेत. बारसू इथे उभारल्या जाणाऱ्या रिफायनरी प्रकल्पाला राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. राज्यसरकारने पोलिसी बळाचा वापर न करता, चर्चेद्वारे मार्ग सोडवावा असे आवाहनही त्यांनी केले. सर्वोच्च न्यायालयातील 16 आमदारांच्या अपात्रतेविषयी न्यायालयाचा निर्णय काय होईल? हे सांगता येऊ शकत नसल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मी पुन्हा येईन ! असं म्हणत असतील तर, त्यांना हा निर्णय कदाचित काय असेल? याची माहिती असावी असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला.