जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांना, ईडीने दुसऱ्यांदा दि .22 मे 2023 रोजी कार्यालयात हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांना यापूर्वी 12 मे 2023 रोजी पहिली नोटीस बजावली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी, आपण ईडीच्या चौकशीला सामोरे जाणार असून ,आजपर्यंत कोणत्याही कंपनीकडून मी कर्ज घेतले नसून, कधीही मनी लॉन्ड्रींग केलेले नाही असा खुलासाही यासोबत केला आहे.
दरम्यान आय एल अँड एफ एल एस कंपनीच्या गैरव्यवहारा संदर्भात ईडीने, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांना नोटीस बजावलेली आहे. यापूर्वीही राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी, मी ईडीच्या कुठल्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार असून ,मला कोणतेही घाबरण्याचे कारण नाही असे सांगितले आहे. दरम्यान केंद्र सरकारच्या धोरण विरोधात केलेल्या वक्तव्यामुळे, तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वरिष्ठ भाजप नेत्यांवर जोरदार टीका केल्यामुळे ,ईडी खात्याने नोटीस पाठवली आहे अशी राजकीय अंतरंगात चर्चा रंगली आहे. ईडी कार्यालयाने दि. 22 मे 2023 वार सोमवार रोजी दुसऱ्यादा समन्स काढून नोटीस बजावली असल्याने, यावेळी मात्र राष्ट्रवादीचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांना हजर कोणत्याही परिस्थितीत राहावे लागणार आहे .