जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
संपूर्ण भारतात येत्या शुक्रवारी रात्री, छाया कल्प चंद्रग्रहण दिसणार असून ,चंद्र पृथ्वीच्या छायेतून जात असल्याने, किंचित अंधूक होतो याला छायाकल्प चंद्रग्रहण असे म्हणतात. खग्रास किंवा खंडग्रास चंद्रग्रहण होताना, चंद्र पृथ्वीच्या गडछायेतून जातो, त्यामुळे चंद्रावर काळी किंवा लालसर रंगाची छटा येते .मात्र छायाकल्प चंद्रग्रहण होताना चंद्र पौर्णिमेसारखाच दिसतो, फक्त त्यावर थोडी काळपट छटा येते ,याला छायाकल्प चंद्रग्रहण असे म्हणतात.खगोलीय शास्त्राच्या दृष्टीने छायाकल्प चंद्रग्रहण हे फार महत्त्वाचे मानले जाते असे खगोल अभ्यासकांनी म्हटले आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार शुक्रवारी रात्री 08 वाजून 44 वाजता ग्रहणाला सुरुवात होऊन, ग्रहण मध्य हा 10 वाजून 52 मिनिटाला असून, ग्रहण समाप्ती ही रात्री 01 वाजून 10 मिनिटांनी होईल. आकाश पूर्णतः ढगाळ नसेल, त्यामुळे साध्या डोळ्यांनी प्रत्येकाला छायाकल्प चंद्रग्रहण व्यवस्थित बघता येईल, शिवाय दुर्बिण किंवा द्विनेत्री असल्यास, छायाकल्प चंद्रग्रहण बघण्याचा आनंद, हा उत्तम दृष्ट्या दृश्याद्वारे दिसू शकेल.