जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
पुण्यातील भारतीय जनता पार्टीचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर होणाऱ्या पोटनिवडणुकीत, महाविकास आघाडीतील ज्या पक्षाची ताकद, सदरहू मतदार संघात जास्त आहे, त्या पक्षाच्या उमेदवाराला उमेदवारी देण्यात यावी असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे .
पुणे लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे लवकरच पोटनिवडणूक होण्याची दाट शक्यता असल्याचे, अंतर्गत गोठातील माहितीनुसार समजत असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. दरम्यान पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुका होत असल्याने, पुणे मतदार संघातील लोकसभेची पोटनिवडणूक होईल का नाही ? याबाबतीत सांगणे अवघड होते, परंतु त्याबाबतीत खात्रीशीर माहिती आपल्याला मिळाल्यानुसार, लवकरच पोटनिवडणूक होण्याची दाट शक्यता असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी पुण्यात केले. महाविकास आघाडीतील घटक पक्षाची ज्यांची जिथे जास्त ताकद आहे, तिथे त्या पक्षाच्या उमेदवाराला तिकीट देण्यास हरकत नाही, तसेच पुणे मतदार संघात आमच्या पक्षाची ताकद किती आहे ? हे माहित सर्वांना आहेच असे सूचक विधान देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे .याबरोबरच महाविकास आघाडीतील संबंधित सर्व मित्र पक्षांना देखील, या गोष्टींवर बोलण्याचा संपूर्ण अधिकार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी नमूद केले आहे.