जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
कर्नाटक विधानसभेच्या अथणी विधानसभा मतदारसंघातील कडवानवर,धाबडाहट्टी,देसरट्टी,कोकटनुर,भोसले वस्ती ऐलडगी, कन्होळी, अडवेश्वर मठ या गावांमध्ये प्रचारसभा,बैठकांना आ.विक्रमसिंह सावंत यांनी उपस्थित राहून, मतदार बंधू भगिनींनी,कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या पाठीशी राहण्याचे आवाहन केले. आमदार विक्रम सावंत यांनी अथणी विधानसभा काँग्रेस पक्षाचे उमेदवार लक्ष्मण सवदी यांचेसाठी संपूर्ण अथणी विधानसभा मतदारसंघ प्रचारार्थ पिंजून काढला आहे. आमदार विक्रम सावंत यांनी ,काँग्रेस पक्षाचे अथणी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार लक्ष्मण सवदी यांच्या प्रचारार्थ मोठी आघाडी घेतली असून ,काँग्रेस पक्षाने दिलेल्या विकासभिमुख आश्वासन दिलेल्या जाहीरनाम्यानुसार अंमलबजावणी केली जाईल असे प्रचार सभेच्या वेळी आश्वासन दिले.
दरम्यान अथणी विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे उमेदवार लक्ष्मण सवदी यांच्या प्रचारार्थ काँग्रेस कार्यकर्त्यांनी तळागाळातील मतदारांच्या पर्यंत संपर्क करून, मतदारांना काँग्रेस पक्षाला मतदान करण्याचे आव्हान करत आहेत. यावेळी जत तालुका कॉंग्रेस कमिटीचेअध्यक्ष आप्पाराया बिरादार,बाबासाहेब कोडग,माेहन मानेपाटील,रामचंद्र सरगर , दिलीप सोलापूरे सावकार, , शिवकुमार तंगडी शिवा गुजरे ,राजू कोरे, मकरंद तिल्याळकर, दस्तगिर नदाफ रावसाहेब मंगसुळी यांच्यासह सर्व नागरिक बंधू भगिनी,कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.