जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
( अनिल जोशी )
सांगलीतील कृष्णा नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न, गेले काही दिवस गाजत असून, नुकतेच सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते," चला जाणूया नदीला" या उपक्रमाअंतर्गत कृष्णा नदीवर, कलश पूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला होता .आज झालेल्या पत्रकार परिषदेत कृष्णा नदीच्या प्रदूषण मुक्तीसाठी, संपूर्ण कृष्णा नदीच्या पात्राच्या भागातील परिसराचा सर्वे करून, योग्य ते उपाययोजना सहित आराखडा तयार करण्याचे आश्वासन सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी दिले. आज जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर, समितीस उपलब्ध असलेल्या निधींचा आढावा, जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी घेतला. सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांना आज पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना, वार्ताहर परिषदेत ते बोलत होते.
सांगलीच्या कृष्णा नदीच्या प्रदूषण मुक्तीसाठी, सखोल सर्वे करून, त्याचा आराखडा बनवून, राज्याचे पर्यावरण मंत्री यांचे कडे, योग्य त्या निधीच्या तरतुदीसाठी पाठवला जाईल. दरम्यान याबरोबरच कृष्णा नदीच्या प्रदूषण मुक्तीच्या विषयात, अतिशय गांभीर्याने लक्ष घालून हाताळणार असल्याचे, जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी स्पष्ट केले आहे .कुपवाड येथील औद्योगिक वसाहतीतील रासायनिक सांडपाणी सद्यस्थितीत जमिनीत ,सीईटीपी प्लांट बंद ठेवून, मुरवले जात असल्याचे पत्रकारांनी निदर्शनास आणून दिले असता, सांगलीचे जिल्हाधिकारी यांचेकडून याबाबतीत अहवाल मागून घेऊन, लवकरच तोडगा काढण्यात येईल असे आश्वासन जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी दिले आहे. कृष्णा नदीच्या प्रदूषण मुक्तीसाठी संपूर्ण सर्वे करून, सदर बाबतीत निधीची किती आवश्यकता आहे? याबाबतीतही तपशीलवार माहिती घेऊन ,त्याचा संपूर्ण अहवाल, राज्याचे पर्यावरण मंत्री यांच्याकडे सादर करून, निधी उपलब्ध करून घेण्यात येईल अशी माहितीही जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी दिली.