जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
देशाचे नेते आदरणीय खा.शरदचंद्र पवार साहेब यांनी २ मे रोजी निवृत्ती चा निर्णय घेतला होता , पण महाराष्ट्रामधील कार्यकर्त्यांच्या भावना चा विचार करत आदरणीय पवार साहेबांनी आज राजीनामा मागे घेत राष्ट्रीय अध्यक्ष पदी कायम राहण्याचा निर्णय घेतला. त्या अनुषंगाने हा निर्णय झाल्या झाल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे सांगली महानगरपालिका क्षेत्रातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी जल्लोष करत फटाक्यांची आतषबाजी करत साखर वाटली.
यावेळी शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज म्हणाले की , आदरणीय पवार साहेबांनी राजीनामा मागे घेतला हा आनंद आमच्यासाठी शब्दात सांगण्यासारखा नाही आहे आज आम्ही नागरिकांमध्ये साखर वाटप करून आनंद व्यक्त केला आहे . पवार साहेबांमुळे प्रत्येक कार्यकर्त्याला सामाजिक व राजकीय जीवनात काम करण्याची ऊर्जा नेहमीच मिळत असते ती आता पुढेही अशीच मिळत राहणार आहे याचा आम्हा सर्वांना आनंद आहे.
यावेळी राष्ट्रवादी चे शहरजिल्हाध्यक्ष संजय बजाज ,महापौर दिग्विजय सुर्यवंशी , हरिदास पाटील , उत्तम कांबळे , समीर कुपवाडे , अनिता पांगम ,वंदना चंदनशिवे , छाया जाधव , डॉ शुभम जाधव , महालिंग हेगडे , अर्जुन कांबळे ,अजित दुधाळ, संदीप व्हनमाणे , आकाराम कोळेकर, मुन्ना शेख , कुमार वायदंडे ,विजय जाधव, अक्षय शेंडगे आदी उपस्थित होते.