जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
केंद्रीय मंत्रिमंडळाची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक पार पडली असून ,त्या बैठकीत खतांच्या किमतीमध्ये कोणतेही वाढ न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यंदाच्या वर्षी खरीप हंगामामध्ये, केंद्र सरकारने खतांसाठी 1 लाख 8000 कोटी रुपये मंजूर केले आहेत. केंद्र सरकारने खतांच्या किमतीत वाढ न करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती, केंद्रीय रसायने आणि खत मंत्री मनसुख मांडवीय यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
केंद्रीय मंत्रिमंडळाने 2022- 23 च्या रब्बी हंगामासाठी तसेच 2023 च्या खरीप हंगामासाठी, पिकांसाठी लागणाऱ्या विविध पोषण घटकानुसार पोषक तत्त्वावर आधारित अनुदानाच्या दरामध्ये ,प्रस्तावित सुधारणा करण्याच्या प्रस्तावालाही मान्यता दिली असल्याची माहीती केंद्रीय रसायने आणि खत मंत्री मनसुख मांडवीय यांनी दिली. केंद्र सरकारच्या सुधारित प्रस्तावानुसार, 2023 च्या खरीप हंगामात केंद्र सरकारकडून, फॉस्फेटिक आणि पोटॅसिक खतांसाठी 38,000 कोटी रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. केंद्र सरकारच्या वरील निर्णयामुळे शेतकरी वर्गाला अनुदानित खतपुरवठा मिळण्याचा मार्ग सुलभ झाला आहे.