जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
सांगलीत कृष्णामाई घाट येथे ,डॉ. सरकार जलतरण ग्रुपच्या लहान मुलांच्या पोहण्याच्या शिबिराची सांगता, सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पृथ्वीराज बाबा पाटील यांचे उपस्थितीत झाली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. पृथ्वीराज पाटील, श्री. पृथ्वीराज पवार, उपमहापौर उमेश पाटील, माधवनगरच्या सरपंच तोरो, महापालिकेचे सहायक आयुक्त नितीन शिंदे यांच्या उपस्थितीत होते.
यावेळी संस्थेच्या जुन्या खेळाडूंचा सत्कार तसेच लहान मुलांच्या पोहण्याच्या स्पर्धेचे बक्षीस वितरण व सरपंच तोरो यांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी पृथ्वीराज पाटील यांनी संघटनेच्या उपक्रमाचे कौतूक करून विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले, तसेच संस्थेच्या मागण्यांची दखल घेऊन महापालिकेच्या माध्यमातून नदीवर लागणाऱ्या सुविधांसाठी प्रयत्न करू असे सांगितले. पृथ्वीराज पवार यांनी विद्यार्थ्यांना पोहण्याच्या कलेचे शारिरीक महत्व सांगितले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. अशोक चव्हाण, मारूती घावट, दीपक सदलगे , अशोक आवटी, मोहन लोहाना, मोहन चोरमोले, भीमगोंड पाटील, शिंदे आण्णा, राजेंद्र आरगे, दिलीप माळी, संजय खेमलापुरे,विनय खोत, हेमंत कासार, दीपक माळी, आकाश चव्हाण, अस्लम मुरसल, शेखर तोरो, बबन सुतार, अनिकेत माने, सुकुमार पाटील, सुनील उपाध्ये आदी संस्थेचे पदाधिकारी, विद्यार्थी, पालक उपस्थित होते. प्रस्ताविक अविनाश जाधव यांनी व सूत्रसंचालन आनंद लिगाडे यांनी केले.