जनप्रतिसाद न्यूज नेटवर्कः
(मिलिंद पाटील)
मुंबई ठाणे येथे झालेल्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये, अद्वैत हेल्थकेअर फाऊंडेशनचे संचालक मदन साताप्पा ढेकळे यांचा युनिव्हर्सल टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड मार्फत विद्यार्थी आरोग्य व इन्शुरन्स क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल फिल्म ऍक्टर मिलिंद दास्ताने (मुळशी पॅटर्न तुझ्यात जीव रंगला फेम) यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. युनिव्हर्सल टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून विविध क्षेत्रात काम करणाऱ्या विशिष्ट लोकांना पुरस्कार प्रदान करत आली आहे. यावर्षीचा आरोग्य व इन्शुरन्स क्षेत्रातील पुरस्कार मदन साताप्पा ढेकळे यांना देऊन त्यांनी त्यांच्या कार्याचा यथोचित सन्मान केला आहे. त्यांना मिळालेल्या या पुरस्कारामुळे कोल्हापूरच्या शिरपेच्यात मानाचा तुरा खोवला गेला आहे. त्यांना मिळालेल्या या पुरस्कारामुळे त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी बी. एन. खरात, ए. आर.आखडे, डी. वाय. एस. पी. शिवाजीराव जमदाडे, एस. बी. युवा फाउंडेशन चे अध्यक्ष सागर भावके, पोलीस सोसायटी महाराष्ट्र राज्याचे चेअरमन संजय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.