सांगलीमध्ये दिनांक 15 जून 2023 वार गुरुवार व 16 जून 2023 वार शुक्रवार रोजी, परमगुरु श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थान पिठापूर(आंध्र प्रदेश)यांच्यावतीने, श्रींचे पादुका दर्शन व रथयात्रा सोहळा.--

0


 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क 

( अनिल जोशी )

सांगलीमध्ये परमगुरू श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थान पिठापूर (आंध्र प्रदेश) यांच्यावतीने संपूर्ण महाराष्ट्रात, श्रीपाद श्रीवल्लभ दत्तात्रेय स्वामी यांच्या पादुकांचे दर्शन व रथयात्रा सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. परमगुरू श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थान पिठापूर (आंध्र प्रदेश) येथील श्रींच्या पादुकांचे  व रथयात्रेचे गुरुवार दि. 15 जून 2023 रोजी रात्री 8:00 वाजता आगमन होत असून , स्थळ- माळी मंगल कार्यालय, लक्ष्मी देऊळ, विश्रामबाग हे आहे. शुक्रवार दि. 16 जून 2023 रोजी सकाळी ठीक 6:30 ते 7:30 वाजेपर्यंत, नामस्मरणासह प्रभात फेरी होणार आहे. सकाळी ठीक 9:00 वाजता श्रींचे पादुकांना अभिषेक व पूजा होणार आहे. सकाळी ठीक 9:00 वाजलेपासून ते सायंकाळी ठीक 4:00 वाजेपर्यंत, सांगली शहरातील सर्व दत्त भक्तांना, श्रींच्या पादुकांचे दर्शन होणार आहे. शुक्रवार दिनांक 16 जून 2023 रोजी 9:00 वाजले पासून सायंकाळी 4:00 वाजेपर्यंत, सांगली शहरातील सर्व दत्त भक्तांना दर्शन सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात येत आहे.

 परमगुरु श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी दत्तात्रेय यांचा जन्म आंध्र प्रदेश मधील पिठापूर येथे झाला असून, श्रीक्षेत्र कुरवपूर (कर्नाटक) येथे, वयाच्या 32 व्या वर्षी अश्विन कृष्ण गुरुव्दादशीस निजानंदी गमन करून, कृष्णा नदीच्या नाभिस्थानी अवतार कार्याची समाप्ती केली. परम गुरु श्रीपाद श्रीवल्लभ दत्तात्रेय स्वामी हे वयाच्या 8 वर्षापर्यंत, श्री क्षेत्र पिठापूर( आंध्र प्रदेश) येथे माता सुमती व पिता आपळराज यांच्या सानिध्यात होते. वयाच्या 9 वर्षापासून ते 16व्या वर्षापर्यंत, भारतातील बद्रिकेदार, काशी, गोकर्ण - महाबळेश्वर अशा तीर्थक्षेत्रांवर, पूर्वनियोजित संकल्पानुसार  अनुष्ठान- तपोसाधना केली. वयाच्या 16व्या वर्षापासून ते वयाच्या 32 व्या वर्षापर्यंत, दत्तप्रभूंची राजधानी असलेल्या व तपोभूमी असलेल्या श्रीक्षेत्र कुरवपूर येथे अनुष्ठान व तपोसाधना केली. परमगुरू श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी दत्तात्रेय यांची श्रीक्षेत्र पिठापूर व श्रीक्षेत्र कुरवपूर ही दोन्हीही स्थाने दत्तप्रभूंची राजधानी असून, अत्यंत जागृत तीर्थक्षेत्रे आहेत. अशा या परमगुरू श्रीपाद श्रीवल्लभ दत्तात्रेय स्वामी यांच्या श्रीक्षेत्र पिठापूर येथील महासंस्थांच्या श्रींच्या पादुकांचा दर्शन सोहळा ,सांगली नगरीत संपन्न होत आहे. तरी सर्व दत्तप्रेमी भक्तांनी श्रींच्या पादुकांच्या दर्शन सोहळ्याचा व रथयात्रा सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन परमगुरु श्रीपाद श्रीवल्लभ दत्तात्रय स्वामी भक्त परिवार सांगली यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top