जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(मिलिंद पाटील)
बिद्री ता. कागल येथील सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम सप्टेंबर महिन्यानंतर घ्यावा असा आदेश राज्य शासनाकडून प्राप्त झाला आहे.राज्यात सर्वाधिक सभासद असलेल्या दूधगंगा वेदगंगा साखर कारखान्याची निवडणुकीची रणधुमाळी ३० सप्टेंबर नंतर होणार असून चार तालुक्याचे कार्यक्षेत्र असलेल्या कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक पुढे ढकलली आहे.
आमदार प्रकाश आबिटकर यांनी मुख्यमंत्री यांना या परिसरामध्ये पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात असतो, त्यामुळे निवडणूक कार्यक्रम 30 सप्टेंबर नंतर घ्यावा, अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली होती. त्या संदर्भात आदेश प्राप्त झाला आहे.