जनप्रतिसाद न्यूज नेटवर्कः
(मिलिंद पाटील)
आज कोल्हापूर शहरात कलियुगातील प्रथम दत्तअवतार श्री श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या पीठापूर येथील पादुकांचे आज कोल्हापूर मधील आझाद चौक इथे असणाऱ्या दत्तभिक्षालिंग मंदिरात आगमन झाले. दुपारी 2 वाजेपर्यंत दर्शन घेत शेकडो भाविकांनी याचा लाभ घेत भक्ती भावाने दर्शन घेतले. तसेच श्री श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या पीठापूर येथील पादुकांचे आझाद चौक इथे असणाऱ्या दत्तभिक्षालिंग मंदिरात आगमन झालेनंतर श्रींच्या पादुकांचे अभिषेक व धार्मिक विधी अत्यंत भक्तीमय वातावरणात पार पडला.
परमगुरु श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी दत्तात्रेय यांचा जन्म आंध्रप्रदेश मधील पिठापूर येथे झाला असून श्री क्षेत्र कुरवपूर (कर्नाटक) येथे वयाच्या 32 व्या वर्षी अश्विन कृष्ण गुरुद्वादशीस निजानंदी गमन करून कृष्णा नदीच्या नाभीस्थानी अवतार कार्याची समाप्त केली. परम गुरु श्रीपाद श्रीवल्लभ दत्तात्रय स्वामी हे वयाच्या आठ वर्षापर्यंत श्री क्षेत्र पिठापूर (आंध्र प्रदेश) येथे माता सुमती व पिता आपळराज यांच्या सानिध्यात होते. वयाच्या 9 व्या वर्षापासून ते 16 व्या वर्षापर्यंत भारतातील बद्रिकेदार, काशी, गोकर्ण, महाबळेश्वर अशा तीर्थक्षेत्रावर पूर्वनियोजित संकल्पानुसार अनुष्ठान-तपोसाधना केली. वयाच्या 16 व्या वर्षापासून ते 32 वर्षापर्यंत दत्तप्रभूंची राजधानी असलेल्या व तपोभूमी असलेल्या श्री क्षेत्र कुरवपूर येथे अनुष्ठान व तपोसाधना केली. परमगुरु श्रीपाद श्रीवल्लभ दत्तात्रेय स्वामी यांचे श्रीक्षेत्र पिठापूर व श्रीक्षेत्र कुरवपूर ही दोन्हीही स्थाने दत्तप्रभूंची राजधानी असून,अत्यंत जागृत तीर्थक्षेत्र आहेत. अशा या परम गुरु श्रीपाद श्रीवल्लभ दत्तात्रेय स्वामी यांच्या श्री क्षेत्र पिठापूर येथील महासंस्थांच्या श्रींच्या पादुकांचा दर्शन सोहळा कोल्हापूर नगरीत संपन्न होत आहे. तरी सर्व दत्त प्रेमी भक्तांनी श्रींच्या पादुकांच्या दर्शन सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन परमगुरु श्रीपाद श्रीवल्लभ दत्तात्रेय स्वामी भक्त परिवार कोल्हापूर यांनी केले आहे.