राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत तन्मयची कास्यपदकाला गवसणी.! पहिल्याच प्रयत्नात मिळवले उत्तुंग यश.---

0


जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

 (मिलिंद पाटील)

न.वा.व.स्वावलंबी विद्यालय येथे एक अकरावी मध्ये शिकणाऱ्या व बॉक्सिंग क्रीडा प्रबोधिनी अकोला येथे प्रशिक्षण घेत असलेल्या तन्मय सचिन कळंत्रे यांने गंगटोक सिक्कीम येथे झालेल्या राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत कास्यपदक मिळवून यश संपादन केले. यशस्वी खेळाडूंचा स्थानिक लोकप्रतिनिधींच्या हस्ते मेडल व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

राष्ट्रीय स्पर्धेत पहिल्याच प्रयत्नात पदकाची कमाई.--- 

6 youth Men's NATIONAL BOXING CHAMPIONSHIP साठी 12 ते 18 जून 2023 दरम्यान गंगटोक सिक्कीम येथे खेळल्या गेलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत तन्मयने पहिल्याच प्रयत्नात कास्यपदक मिळवून राष्ट्रीय पदकाची कमाई केली.

 सलग पाच वेळा राज्य स्पर्धेत सुवर्णपदक कामगिरी करण्याचा मान मिळवणारा विजेता.--- 

तन्मय ने यापूर्वीही राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत सलग 5 वेळा सुवर्ण पदकांची कमाई करून 2 वेळा उत्कृष्ट राज्यस्तरीय बॉक्सर हा किताब मिळवण्याचा मान मिळवला आहे. आणि याच कठोर परिश्रम आणि सरावात सातत्य याच्या जोरावर त्यांने गंगटोक सिक्कीम येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत पहिल्याच प्रयत्नात कास्यपदक पटकावले.

एकूण 13 गटांमध्ये स्पर्धा.--- 

तन्मयच्या गटामध्ये एकूण 24 खेळाडू होते. प्रतिस्पर्धी खेळाडूला धूळ चारत त्यांने आपलं पदक खेचून आणले. स्पर्धेत एकूण 350 पेक्षा अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. एकूण 13 गटांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली होती.

यांचे लाभले मार्गदर्शन.--- 

न.वा.व स्वावलंबी विद्यालय अकोला येथे अकरावी मध्ये शिकणाऱ्या तन्मयला क्रीडा प्रबोधिनी अकॅडमीचे प्रिन्सिपल सतीशचंद्र भट्ट, प्रशिक्षक गजानन कबीर, आदित्य मने यांचे तंत्रसिद्ध मार्गदर्शन लाभले. तसेच वेळोवेळी वडील सचिन व आई वैशाली यांच्यासह कुटुंबातील सर्व सदस्यांचे प्रोत्साहन मिळाले.



Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top