जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
महाराष्ट्र राज्यात काल सर्वत्र ठिकाणी पाऊस झाल्याचे वृत्त असून ,राज्यातील परिसर मान्सूनने व्यापला आहे. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, कोकणासह घाटमाथ्यावर पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. विदर्भाच्या पूर्व भागात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा आज देण्यात आला आहे. काल राज्यात सर्वत्र ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडल्या आहेत. सद्य परिस्थिती कोकणात पावसाचा जोर कायम असून, मध्य महाराष्ट्रातील पालघर, मुंबई, रायगड, रत्नागिरी ,पुणे ,सातारा, ठाणे, अमरावती, गोंदिया, नागपूर, भंडारा आदी जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा म्हणजे ऑरेंज ॲलर्ट देण्यात आलेला आहे.
दरम्यान सिंधुदुर्ग ,चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, कोल्हापूर आदी ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा म्हणजे येलो अलर्ट देण्यात आला आहे. याबरोबरच यवतमाळ ,अकोला ,वाशिम, बुलढाणा आदी जिल्ह्यांना विजेच्या गडगडाटासह पावसाचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट देण्यात आला आहे. सध्याच्या परिस्थितीत उडीसा, दक्षिण झारखंड, उत्तर छत्तीसगड, परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे, समुद्रसपाटीपासून चक्राकार वारे बऱ्याच उंचीवर वारे वाहत असून, राजस्थान पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. दक्षिण गुजरात पासून केरळ पर्यंत असलेल्या किनारपट्टीवर, कमी दाबाचा पट्टा सध्या सक्रिय अवस्थेत आहे