जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे प्रदेशाध्यक्ष व माजी मंत्री मा. जयंतरावजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली शहर जिल्हा अध्यक्ष मा .संजयजी बजाज साहेब व युवक शहरजिल्हा अध्यक्ष मा. राहुल पवार यांच्या नेतृत्वाखाली अविरतपणे सुरु असलेल्या महाआरोग्य शिबीरा अंतर्गत आज ८ जणांची मोतिबिंदू आँपरेशनची ९२ वी बँच पार पडली , सदरचे मोतिबिंदु आँपरेशन पुर्णपणे मोफत करण्यात आले.यावेळी पेशंटच्या भेटप्रसंगी राष्ट्रवादी कुपवाड शहर अध्यक्ष तानाजी गडदे ,राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे उत्तम (आबा) कांबळे ,कामगार सेल चे नितीन माने ,राहुल हिरोडगी , आशिष पवार, सनी गाडे , संतोष जाधव , अशोक पाटील यांच्या सह प्रमुख सचिव डॉ शुभम जाधव , रोहित आठवले आदी उपस्थित होते.
या कामाचा पाठपुरावा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे प्रमुख सचिव व विद्यार्थी शहरजिल्हा अध्यक्ष डॉ शुभम जाधव , निलेश शहा, रोहित आठवले ,अजीम मुल्ला,यांनी केला.