जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात, सर्व विरोधी पक्षांची आज बंगळूरमध्ये बैठक होत असून, त्यामध्ये आगामी रणनीती ठरवण्यावर भर देण्यात येणार आहे. नुकत्याच झालेल्या मागील पाटण्यातील विरोधकांच्या बैठकीत 15 विरोधी पक्षांनी उपस्थिती लावली होती. दरम्यान आजच्या बंगळूर मध्ये होणाऱ्या बैठकीस, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, सत्ताधारी जनता पार्टीच्या विरोधात, जवळपास 24 विरोधी पक्ष बैठकीत एकत्र येऊन रणनीती आखण्याची शक्यता आहे.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे व काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत ही बैठक होत असून यामध्ये आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाबाबत शिवाय समान कार्यक्रमाच्या विविध मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ह्या पण या बैठकीस उपस्थित राहणार आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे सुद्धा उपस्थित राहणार असून, या बैठकीस बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, माजी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ,राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते सुद्धा या बैठकीस हजर राहणार आहेत. दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे, दुपारच्या दरम्यान बंगळूर कडे रवाना होत असल्याचे वृत्त आहे. आज कर्नाटकची राजधानी असलेल्या बंगळूरमध्ये ठिकठिकाणी विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या स्वागताचे फलक लागले असून ,आज होणाऱ्या विरोधी पक्षांच्या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपासह समान कार्यक्रमाच्या विविध मुद्द्यावर चर्चा होणे अपेक्षित आहे. एकंदरीतच सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात विरोधी पक्षांच्या आज होत असलेल्या बंगळूर मधील बैठकीनंतर, पुढील रणनीती आखण्यावर सर्व विरोधी पक्षांच्या कडून भर देण्यात येईल असे चित्र अधोरेखित झाले आहे.