जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
महाराष्ट्र राज्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली असून, धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. महाराष्ट्र राज्याची जीवन संजीवनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयना धरणाचा पाणीसाठा जवळपास 35 टीएमसी झाला आहे , तर वारणा धरणात 17.11 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. राज्यातील सर्वच धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत असून, धरणांच्या पाणलोट क्षेत्रात विक्रमी पाऊस पडत आहे.
राज्यात सर्वत्र पावसाची संततधार सुरू असून कोकणात , पूर्व विदर्भात मध्य महाराष्ट्रात, पश्चिम महाराष्ट्रात दमदार पाऊस होत आहे. यंदाच्या वर्षी प्रथमच वारणा नदीचे पाणी पात्र बाहेर पडले असून, बंधारे पाण्याखाली जात आहेत. सध्या सुरू असलेल्या राज्यातील पावसामुळे खरीप पिकांच्या पेरणीच्या कामाला वेग आला आहे. राज्यातील शेतकरी वर्ग होत असलेल्या दमदार पावसामुळे, आनंदीत झाला असून ,खरीप पिकांच्या पेरणीला सुरुवात झाली आहे .कोयना धरण पाणलोट क्षेत्रात आज 165 मिलिमीटर पाऊस झाला असून, महाबळेश्वर येथे 231 मिलिमीटर नवजा येथे 307 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोयना धरणात आज दिवसभरात 6 टीएमसी ने पाणीसाठ्यात वाढ होऊन, जवळपास 35 टीएमसी पाणीसाठा झाला आहे .कोयना धरण पाणलोट क्षेत्रात असाच पाऊस पडत राहिल्यास, 50 टीएमसी पर्यंत पाणीसाठा होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.