जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
भारतीय अवकाश संशोधन संस्था( इस्रो )ने, चांद्रयान -3च्या सफल मोहिमेनंतर, पुढील काही दिवसांमध्ये सूर्याचा अभ्यास करण्यासाठी,"आदित्य एल-1"मिशन हाती घेतले आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेने( इस्रो) हाती घेतलेल्या आदित्य एल -1 या सूर्याच्या अभ्यास करण्यासाठी मोहिमेची प्रक्रिया, अतिशय गुंतागुंतीची असणार असून, संपूर्ण जगातील सर्व देशांच्या शास्त्रज्ञांचे याकडे लक्ष असणार आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्था,इस्रोकडून ऑगस्टच्या अखेरीस किंवा सप्टेंबरच्या सुरुवातीस ही मोहीम लॉन्च करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. विश्वातील अंधकारमय जीवन नष्ट करणाऱ्या सूर्याच्या "आदित्य एल व-1" मोहिमेमुळे ,सूर्याच्या संशोधनात्मक अभ्यासाला एक वेगळेच वळण मिळणार असून, ही मोहीम एक खास अर्थाने वैशिष्ट्यपूर्ण असणारी मोहीम असणार आहे.
"आदित्य एल-1"सूर्य यान हे पृथ्वी व सूर्या दरम्यान एल -1 कक्षेत ठेवण्यात येणार आहे."आदित्य एल -1"अवकाशातील हवामानाची गतिशीलता,कणांचा प्रसार व प्रदेशाची भौगोलिक समस्या आधी गोष्टींवर प्रकाश पडून,माहिती विश्वाला प्रदान करेल असा भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांचा म्हणजेच इस्रोच्या शास्त्रज्ञांचा विश्वास आहे.एकंदरीतच चांद्रयान तीनच्या सफल मोहिमेनंतर, आता संपूर्ण विश्वातील जगाचे लक्ष हे,आदित्य एल-1 सूर्य यान मिशन कडे असणार आहे.