जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
जळगाव येथील मुक्ताईनगर तालुका काँग्रेसच्या वतीने नरवेल मुक्ताईनगर तालुका येथे आदिवासी दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये बिरसा मुंडा आदिवासींचे दैवत यांचे पूजन करून, जागतिक आदिवासी दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी आदिवासी बांधवांनी नृत्य सादर केले. जळगाव येथील मुक्ताईनगर तालुक्यात, दरवर्षी परंपरेप्रमाणे आदिवासी दिनानिमित्त, बिरसा मुंडा जयंती उत्सव, फार मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधवांच्या कडून एकत्र येऊन, आनंदात व उत्साहात पार पाडला जातो. या उत्सवात आदिवासी समाजाचे नृत्य लक्षवेधी ठरत असते.
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील आदिवासी समाज बांधव एकत्र येऊन, आदिवासी दिनानिमित्त बिरसा मुंडा जयंती उत्सव करत असतात. या आदिवासी दिनानिमित्त झालेल्या बिरसा मुंडा जयंती उत्सवात ,अनिल बारेला,किरण बारेला,राजू बारेला,योगेश बारेला,दिलीप,आकाश,जितेंद्र,कोरकू,नर्सिंग बारेला,लखन बारेला,शुभम भरेला हे उपस्थित राहून, बिरसा मुंडा जयंती उत्सव पार पाडला. त्याप्रसंगी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष ओ.बी.सी.विभाग डॉ.जगदीश दादा पाटील,दिनेश पाटील तालुकाध्यक्ष मुक्ताईनगर,काँग्रेस सेवादल तालुका अध्यक्ष प्राध्यापक सुभाष पाटील,अनिल वाडीले प्रदेश सचिव विभाग,तालुका कार्याध्यक्ष राजेंद्र जाधव, शेख भैय्या शेख करीम शहर प्रमुख अंतुर्ली काँग्रेस शिवाजी भाऊ पाटील तसेच बहुसंख्य नागरिक,आदिवासी महिला भगिनी उपस्थित होत्या..