जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
सध्या देशात बदल हवा असल्याने, मोदी सरकारला अनुकूल वातावरण दिसत नसून, देशातील बदलाच्या इच्छेने इंडिया आघाडीची स्थापना केली असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषदेत केले आहे. आगामी येणाऱ्या 2024 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत अनुक्रमे केंद्रात व राज्यात चित्र बदलण्यासाठी, जे काही करावे लागेल ते करण्याची तयार ठेवू असेही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूर विषयी बघ्याची भूमिका घेतली असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.
दरम्यान सध्य स्थितीत राजकीय नेत्यापेक्षा ईडी प्रभावी ठरली असून, या शक्तीमुळे राजकारणातले अनेक निर्णय आकारास येत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. त्याचबरोबर शिवसेनेबाबत निवडणूक आयोगाचा जो प्रयोग झाला,तोच प्रयोग आपल्या बाबतीत होण्याची शक्यता असून, निवडणूक आयोगाच्या दिलेल्या चिन्हाबाबतच्या नोटिसीला उत्तर दिले असल्याचे प्रतिपादन शरद पवार यांनी केले.आजपर्यंतच्या इतिहासात 14 वर्षे निवडणुका वेगवेगळ्या चिन्हावर लढून सुद्धा,आम्ही जिंकलो आहोत. त्यामुळे चिन्हाची चिंता करण्याचे कारण नसल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.